सीईओंनी सांगितलं आता तुम्हाला रोज 12 तास काम करायचंय! कर्मचाऱ्यांनी थेट...
12 तास काम करावे लागेल अशा सूचना देणाऱ्या बॉसला कर्मचाऱ्यांनी असा रिप्लाय दिलाय की कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे.
CEO Death Threats : कोणताही व्यवसाय यय़स्वी होण्यासाठी सहकार्य करणारे कर्मचारी हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. प्रत्येक ठिकाणी कामाच्या वेळा तसेच कामाचे स्वरुप ठरलेले असते. कंपनीचे मॅनेजमेंट किंवा कंपनीचा मालक यांना कामाच्या वेळा तसेच वर्क कल्चर ठरवण्याचे अधिकार असतात. अमेरिकेत आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्टार्टअप (AI Startu) सुरु करणाऱ्या एका भारतीय वंशांच्या मालकाला आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क कल्चरबाबत सांगणे चांगलेच महागात पडले आहे.
दक्ष गुप्ता असे मालकाचे नाव आहे. दक्ष गुप्ता या भारतीयच वंशाच्या तरुणाने अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे ग्रेप्टाइल (Greptile) नावाचे आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्टार्टअप (AI Startu) सुरु केले आहे. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी वर्क कल्चरबद्दल सांगताना 12 तास काम करावे लागेल अशी सूचना दिली. दक्ष गुप्ता यांच्या सूचना ऐकून कर्मचारी भडकले. त्यांनी दिलेल्या रिप्लायमुळे माझी झोप उडाली. दक्ष गुप्ता यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी कमर्चाऱ्यांनी नेमका काय रिप्लाय दिलाय याबाबत माहिती दिली. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. कर्मचारी आणि कंपनी यांच्यात पारदर्शकता असावी यासाठी दक्ष गुप्ता त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्यांसाठी तसेच येथे काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी सोशल मिडियावर पोस्ट केली.
दक्ष गुप्ता यांची सोशल मिडिया पोस्ट व्हायरल
ग्रेप्टाइल कंपनीत 84 तासांचा कामाचा आठवडा आहे. येथे रात्री उशिरापर्यंत काम चालते. वीकेंडलाही कर्मचारी काम करतात. कंपनीकडे नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पहिल्या मुलाखतीतच सांगतो की ग्रेप्टाइलमध्ये वर्क-लाइफ बॅलन्स होत नाही. कर्मचारी सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत काम करतात. अनेकदा कर्मचाऱ्यांना शनिवारी आणि कधीकधी रविवारी देखील काम करावे लागते. कर्मचारी आणि कंपनी यांच्यात पारदर्शकता असावी यासाठी मी सोशल मिडियावर अशी पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टवर 1.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. तर, लाखो कमेंट्स आले आहेत.
दक्ष गुप्ता यांना कर्मचाऱ्यांकडून धमकी
वर्क बॅलेन्स संदर्भात करण्यात आलेली पोस्ट व्हायरल झाल्यापासून मला हजारो इमेल आले आहेत. यात माझ्यावर टीका करण्यात आली आहे. अनेकांनी या वर्क कल्चरचा संताप व्यक्त केला आहे. तर, इमेलच्या माध्यमातून मला कर्मचाऱ्यांनी धमकी दिल्याचे दक्ष गुप्ता यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हंटले आहे.