धर्मशाला : चीनमध्ये सध्या कोरोना वायरस थैमान घालत आहे. यामुळे जगभरात दहशत पसरली आहे. चिनमधून येणाऱ्या स्वदेशी येणाऱ्या नागरिकांना कोरोनोची लागण झाल्याच्या संशयाने पाहिले जात आहे. चीनमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी यावर मंत्र जपण्याचा सल्ला दिलाय. त्यांच्या कार्यालयातर्फे हा सल्ला देण्यात आला. चीनच्या एका बौद्ध समुहाने कोरोना वायरसची लागण थांबण्यासाठी सल्ला मागितला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय तिबेटी प्रशासन (सीटीए)च्या वेबसाईटवर एक पोस्ट लिहीण्यात आली आहे. यामध्ये जितकं शक्य असेल तितका तारा मंत्राचा जप करण्याचे आवाहन अनुयायी आणि बौद्ध मठांना देण्यात आले आहेत. यामुळे कोरोना वायरसच्या महाप्रलय रोखण्यास मदत होईल असे सांगण्यात आले आहे. 



दलाई लामा यांनी हा तारा मंत्र उच्चारुन आपली ऑडीओ क्लीप प्रसारित केली आहे. चीनचे धर्म आणि सांस्कृतिक मंत्री गेलेक यूथोक यांनी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती संवेदना व्यक्त केली. चीनी जनता आणि सरकार यावर लवकरच नियंत्रण आणण्यास समर्थ असेल असे सांगण्यात आले आहे.


जगभरात दहशत 


भारतामध्ये देखील कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरु आहेत. ही व्यक्ती चीनमधून एमबीबीएस करुन भारतात आला आहे.


कोरोना व्हायरस अमेरिकेत देखील पोहोचला आहे. अमेरिकेत ५ रुग्ण आढळून आले आहेत. पहिला व्यक्ती हा चीनच्या वुहान येथून अमेरिकेत आला होता. २६ राज्यांमधील १०० लोकांची तपासणी केली गेली. ज्यामधील ५ जण हे संशयित आढळून आले.