मुंबई : यूएसमधील एक नाट्यमय फुटेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये न्यू मेक्सिकोस्थित एक आई आपल्या मुलांना अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून वाचवण्यासाठी आपल्या जीवाचीही परवा केली नाही. कारण तिने जे केलं, त्यामुळे तिच्या जीवाला देखील धोका होता. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे पाहुन तुम्हाला देखील बसेल धक्का.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर या 33 वर्षीय मेलोडी माल्डोनाडोने तिच्या मुलांना वाचवण्यासाठी तिची पांढरी कार ह्युंदाई सांता फेवर उडी मारली आणि त्याच्या बोनेटवर लटकू लागली.


न्यू मेक्सिकोमधील एका सुविधा स्टोअरच्या बाहेर मेलोडी माल्डोनाडोने आपली गाडी पार्क केली, ज्यामध्ये तिची सहा वर्षांची मुलगी आणि 11 महिन्यांचा मुलगा होता. जेव्हा मेलोडी माल्डोनाडोने स्टोरमधून बाहेर कार जवळ आली. तेव्हा तिला दुसऱ्या एका महिलेनं ढकललं आणि ती महिला या कारमध्ये बसली. त्यानंतर आपल्या मुलांना वाचवण्यासाठी मेलोडी माल्डोनाडोने कारच्या बोनटवर उडी घेतली आणि लटकू लागली.


ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. गाडी चोरी केलेल्या महिलेचं नावं रेजिना कॅस्टिलो असल्याचं सांगण्यात येत आहे.



मेलोडी माल्डोनाडोने सांगितले की, ''तिने ओरडूनही त्या महिलेला सांगितले की, तिची मुलं आत आहेत, परंतु तरी देखील या महिलेनं गाडी थांबवली नाही आणि आम्ही खूप पुढे गेलो. खरंतर मी गाडीवरुन पडावी म्हणून ती महिला गाडी हलवत होती. ज्यामुळे अखेर मी पडले आणि माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली." 


मालडोनाडोने पुढे सांगितले की, ''मी पडल्यानंतर काहीही पाहिले नाही, मी सरळ उठले आणि जवळील दुकानावरुन पोलीसांना फोन केला. मला माझ्या गाडीची काळजी नव्हती. पण मला माझी मुलं हवी होती, ज्यांच्यासाठी मी कशाचीच पर्वा केली नाही.''


हॉब्स पोलिस विभागाला कार शोधण्यात यश आले आणि त्यांना आढळले की कार जॅकरने त्याच्या मोठ्या मुलीला एका चौकात फेकून दिले. त्यानंतर त्यांनी नवजात मुलासह वाहन सोडून पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्या अपहरण कर्त्या महिलेला अटक केली आणि ती आता तुरुंगात आहे.