न्यूयॉर्क : मोठ्या लोकांचे शौक किती मोठे असतात हे काही वेगळं सांगायला नको. पण आता समोर आलेलं हे प्रकरण याआधी कदाचित तुम्ही ऎकलं किंवा पाहिलं नसेल. कदाचित हे वाचून तुम्हाला शॉकही लागू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला कुणी सांगितलं की, एका श्रीमंत जोडप्याने त्यांच्या अंडरविअर ठेवण्यासाठी एक वेगळी रूम बांधली आहे. तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? आणि विश्वास बसला तरी आश्चर्य नक्कीच होईल.


५० लाख रूपये खर्च


लोकप्रिय कपल डेविड आणि व्हिक्टोरिया बेकहम यांनी तब्बल ६० लाख पाऊंड्स किंमत असलेल्या कोट्सवोल्ड्स स्थित घरात अंडरविअर ठेवण्यासाठी एक रूम तयार केली आहे. आणि या रूमसाठी त्यांनी तब्बल ६० हजार पाऊंड खर्च केलाय. मिरर डॉट को डॉट यूकेच्या रिपोर्टनुसार, ग्रेड २ यादीतील या फार्म हाऊसमध्ये हे नव्याने काम करण्यात आलंय. याआधी या घरात मालिशसाठी वेगळी रूम आणि कॅटवॉकसाठीही वेगळी रूम तयार करण्यात आली. ६० हजार पाऊंड भारतीय रूपयात ५० लाख रूपयांपेक्षा जास्त होतात. 



चपला-जोड्यांसाठी वेगळी रूम


डेली स्टारला एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ज्या रूमबद्दल सगळेजण बोलताहेत ती अंडरविअर ठेवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही एक मोठी रूम आहे. यासोबतच व्हिक्टोरियाने तिच्या बेडरूममध्ये डिझायनर कपडे ठेवण्यासाठी एक रूम तयार केली आहे. तेच या घरात त्यांच्या चपला-जोड्यांसाठी आणि बॅग ठेवण्यासाठीही वेगळी रूम आहे. व्हिक्टोरियाने अंडरविअर आणि नाईटविअर ठेवण्यासाठीचीही रूम तिच्या मनासारखी करून घेतली आहे’.



मुलांना रूममध्ये जाण्यास बंदी


सूत्रांनी सांगितले की, ‘या रूममध्ये दोघांनी आपापली नावं असलेल्या आणि नक्षीकाम केलेले पायजामे आणि त्यांच्या आवडीच्या अंडरविअर तसेच नाईट्विअर ब्रॅन्ड्सचे शेकडो कपडे ठेवले आहेत. त्यांच्या मुलांना या रूममध्ये जाण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नाहीतर या रूमच्या दरवाज्यावर सिक्युरिटी किपॅडही लावण्यात आलंय’.