NASA : जग टेन्शनमुक्त झालं, पृथ्वीवरचं मोठं संकट टळलं; अखेर फेल झालेले सॅटेलाईट...
NASA : RHESSI स्पेसक्राफ्ट असे या कोसळलेल्या उपग्रहाचे नाव आहे. NASA चा हा उपग्रह 21 वर्षांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2002 मध्ये अवकाशात झेपावला होता. 21 वर्षांपूर्वी उपग्रह फेल झाल्याने अनियंत्रित स्थिती होता. पृथ्वीच्या कक्षेत तरंगणारा हा उपग्रह थेट पृथ्वीवर कोसळणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांना मिळाली होती.
NASA RHESSI Spacecraft : पृथ्वीवरचं मोठं संकट टळलं आहे. जग टेन्शनमुक्त झालं आहे. फेल झालेले NASA चे सॅटेलाईट 21 वर्षानंतर पृथ्वीवर कोसळणार होते. हे सॅटेलाईट कोसळल्यानंतर पृथ्वीवर मोठा विशान होईल अशी भिती व्यक्त केली जात होती. कारण हे सॅटेलाईट नेमकं कुठे कोसळणार याचबाबत काहीच अंदाज लावता येत नव्हता. मात्र, आता हे सॅटेलाईट अशा ठिकाणी कोसळले आहे ज्यामुळे मनुष्याला कोणताही हानी पोहचलेली नाही.
RHESSI स्पेसक्राफ्ट असे या कोसळलेल्या उपग्रहाचे नाव आहे. NASA चा हा उपग्रह 21 वर्षांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2002 मध्ये अवकाशात झेपावला होता. 21 वर्षांपूर्वी उपग्रह फेल झाल्याने अनियंत्रित स्थिती होता. पृथ्वीच्या कक्षेत तरंगणारा हा उपग्रह थेट पृथ्वीवर कोसळणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांना मिळाली होती. 19 एप्रिल रोजी हा उपग्रह कोसळणार होता. हा उपग्रह नेमका कधी आणि कुठे कोसळेल याबाबत शास्त्रज्ञांना अंदाज लावता येत नव्हता यामुळे संपूर्ण जग चिंतेत होते.
अखेर सॅटेलाईट कोसळले
अखेर 19 एप्रिल 2023 रोजी उत्तर आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात हे सॅटेलाईट कोसळले आहे. NASA च्या वैज्ञानिकांनी हे सॅटेलाईट सहारा वाळवंटात कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 273 किलो वजनाचा हा उपग्रह 26 अंश रेखांश आणि 21.3 अंश अक्षांशावर हे सॅटेलाईटसहारा वाळवंटात कोसळला आहे.
कोणतीही जीवीत अथवा वित्त हानी नाही
हे सॅटेलाईट सहारा वाळवंटात कोसळल्याने मोठी हानी टळली आहे. वाळवंटातील निर्मनुष्य ठिकाणी हे सॅटेलाईट कोसळले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत अथवा वित्त हानी झालेली नाही. जर या उपग्रहाचे अवशेष मानवी वस्तीत कोसळल्यास मोठा विनाश होईल अशी भिती व्यक्त केली जात होती. हे सॅटेलाईट समुद्रात कोसळेल असा अंदाज देखील शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. मात्र, अखेरीस हे सॅटेलाईय वाळवंटात कोसळले आहे.
21 वर्षांपासून होते अनियंत्रीत
RHESSI स्पेसक्राफ्ट या उपग्रहाचे पूर्ण नाव Reuven Ramaty High Energy Solar Spectroscopic Imager असे आहे. सूर्यापासून निघणाऱ्या सौर लहरी आणि कोरोनल मास इजेक्शन यांचा अभ्यास करण्यासाठी हे सॅटेलाईट लाँच करण्यात आले होते. NASA चा हा उपग्रह 21 वर्षांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2002 मध्ये अवकाशात झेपावला होता. यानंतर हा उपग्रह फेस गेला आणि अनियंत्रीत झाला. हा उपग्रह तब्बल 21 वर्षांपासून अनियंत्रीत स्थिती होता.