मुंबई : युक्रेनमध्ये रशियन सैन्याचे हल्ले सुरू असून या युद्धाला जवळपास एक महिना उलटून गेला आहे. रशिया आपल्या गुप्तचर संस्थांमुळे जगभर प्रसिद्ध आहे आणि तेथे काही ठिकाणे आहेत ज्यांचे रहस्य आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही. असेच एक ठिकाण पूर्व रशियातील सायबेरिया भागात आहे. ज्याला खाणींचे शहर म्हटले जाते. मिर्नी असे या शहराचे नाव आहे जे जगात आपली वेगळी ओळख टिकवून आहे.


विमानाला देखील आत ओढण्याची तारीख 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डेलीस्टार'च्या बातमीनुसार, मिर्नी हे शहर एका मोठ्या हिऱ्याच्या खाणीभोवती वसले आहे. ही खाण 1772 फूट खोल असून तिचा व्यास सुमारे 4 हजार फूट आहे. ही जगातील सर्वात मोठ्या खाणींपैकी एक आहे. 


त्यात अनेक रहस्यमय हिरे असल्याचे मानले जाते. हिऱ्याच्या खाणीचा हा खड्डा वरून जाणारी कोणतीही वस्तू खेचू शकतो, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.


खाणीच्या खड्यावरून उडणारी छोटी विमाने आणि हेलिकॉप्टरही त्याचा फटका बसू शकतात.


मिर्नी शहराची स्थापना 1955 च्या सुमारास झाली. जेव्हा सोव्हिएत युनियन दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्वतःची पुनर्बांधणी करत होते. असे मानले जाते की हे संपूर्ण शहर खांबांवर बांधले गेले आहे.


येथे राहणारी बहुतांश लोकसंख्या अल्रोसा नावाच्या कंपनीसाठी काम करते. या शहराची बहुतेक जमीन परमाफास्टने व्यापलेली आहे आणि उन्हाळ्यात येथील जमीन चिखलात बदलते. खांबांच्या वर बांधलेली घरे लोकांना चिखल आणि पाण्यापासून वाचवतात.
 
अतिशय कडक थंडी असते या परिसरात 


या भागात एवढी थंडी पडते की, वाहनांचे टायरही फुटतात आणि तेल गोठते. हिऱ्यांच्या शोधादरम्यान शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, हिवाळ्यात येथील तापमान उणे ४० अंशांपर्यंत जाते.


1957 मध्ये या शहरात हिरे सापडल्यानंतर खाण बांधण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र येथील हवामानामुळे हे काम खूपच अवघड होते. या कारणास्तव ही खाणही अनेकदा बंद करण्यात आली आहे.


1960 पासून कार्यान्वित झाल्यानंतर, खाणीतील अनेक मौल्यवान हिरे काढण्यात आले आहेत. या खाणीतून ३४२ कॅरेटचा पिवळा हिरा सापडला.


जो कोणत्याही देशात सापडलेला सर्वात मोठा हिरा होता. मात्र 2004 साली अचानक ही खाण बंद करण्यात आली. याचे कारण देत अधिकाऱ्यांनी येथे उत्खनन शक्य नसून त्याचे रहस्य उलगडणेही अवघड असल्याचे सांगितले होते.