नवी दिल्ली : कुवैत तुरुंगातील १५ भारतीय कैद्यांची देहदंडाची शिक्षा रद्द करण्यात आलीय... ही शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिलीय. शनिवारी सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर १५ भारतीय नागरिकांची देहदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलल्याबद्दल कुवैतच्या अमीरच्या उदारतेच्या प्रदर्शनावर आभार व्यक्त केलेत. 


सोबतच कुवैतच्या अमीरनं ११९ भारतीय नागरिकांची शिक्षा कमी करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी म्हटलंय.