मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. परंतु युक्रेन देखील काही कमी नाही. युक्रेनच्या सैन्यांनी रशियाचे अनेक टँक नष्ट केलेत. त्यात गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एक असं विधान केलं आहे, ज्यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. यामध्ये त्यांनी गरज पडल्यास इतिहासात जे घडलं नाही असं काहीतरी करण्याची धमकी दिली. त्यांचा हा इशारा अणू बॉम्बकडे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. ज्यामुळे या युद्धाला तिसऱ्या महायुद्धाचे स्वरुप धारण केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियासारख्या देशाचे सैन्य युक्रेनला पूर्णपणे नष्ट करू शकते. रशिया सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे. सामर्थ्यशाली देशांचा विचार केला तर असे अनेक देश आहेत, ज्यांचे सैन्य खूप शक्तिशाली आहे.


दरम्यान, ग्लोबल फायरपॉवरने जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याची यादी जाहीर केली आहे. या यादीत सामील असलेल्या शक्तिशाली देशांची नावे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


या यादीत अमेरिकेचे नाव पहिल्या पहिले स्थानी. अमेरिकेचे सैन्य हे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांपैकी एक मानले जाते.


अनेक घटकांची पूर्तता करून अमेरिकेला पहिले स्थान मिळाले आहे. अमेरिकेने आपल्या संरक्षणासाठी 700 अब्ज डॉलर्स म्हणजेच 5,25,38,78,00,00,000.01 रुपये बजेट ठेवले होते.


रशियाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. रशियाचे सैन्यही खूप शक्तिशाली आहे. त्याचा पॉवर इंडेक्स 0.0501 आहे आणि या देशाच्या सैन्यात सुमारे 9 लाख सक्रिय सैनिक आहेत.


त्याच वेळी, चीनचे सैन्य तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांच्याकडे सुमारे 20 दशलक्ष सक्रिय सैनिक आहेत. बहुतेक काम हे या देशाच्या लष्कराकडून करुन घेतले जाते. चीनचा पॉवर इंडेक्स 0.0511 आहे.


त्यानंतर भारताचे नाव चौथ्या स्थानावर आहे. भारताचे नाव लष्करी यादीत चीनच्या खाली असले, तरी अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये भारताने चीनला चांगलाच धडा शिकवला आहे. भारताचा पॉवर इंडेक्स 0.0979 आहे.


जपानचे सैन्य पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचा पॉवर इंडेक्स 0.1195 आहे. त्याचबरोबर दक्षिण कोरिया आणि फ्रान्स सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. फ्रान्सचा निर्देशांक 0.1283 आहे.


उत्तर कोरियाचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. कारण देशाचा हुकूमशहा लष्करी माहिती जगापासून लपवून ठेवतो. या यादीत नववा क्रमांक पाकिस्तानला देण्यात आला आहे. त्याच वेळी, ब्राझील दहाव्या क्रमांकावर आहे, ज्याचा पॉवर इंडेक्स 0.1695 आहे.