मुंबई : सोशल मीडियावर सध्या एका कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा कुत्रा बाईक चालवत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओला सध्या मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट मिळत असून या बाईकवेड्या कुत्र्य़ानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाईक चालवणारा हा कुत्रा पाहा. याचं नाव आहे ल्युक. चेन्नईतल्या रस्त्यावर हा ल्यूक सुसाट वेगानं बाईक चालवत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा कुत्रा बाईकवर आरामशीर बसला आहे. पुढचे दोन पाय त्यानं बाईकच्या दोन्ही हँन्डल्सवर ठेवलेत. बाईक वेगात असतानाही त्याचा रुबाब पाहण्यासारखा आहे. जणू हा कुत्रा स्वतःच बाईक चालवतोय. एका ठिकाणी खड्डा लागल्यावर कुत्रा थोडासा बावचळला. पण त्यानंतर तो सावरला.


बाईक चालवणारा ल्यूक हा एकटा कुत्रा नाही थायलंडमध्येही एक स्कूटीवर बसलेल्या कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा कुत्राही स्कुटीवर ऐटीत बसलेला दिसतो. वास्तविक पाहता हे या दोन कुत्र्यांच्या बाबतीत नाही. बहुतांश कुत्र्यांना बाईकवर बसायला आवडत असल्याचं निरीक्षक जाणकार नोंदवतात. त्यासाठी कुत्र्यांना बाईकवर कसं बसवावं याची पद्धतही ते सांगतात. सुरूवातीला कुत्र्याला बाईकवर बसवल्यावर त्याला शांत होऊ द्यावे. शांत झाल्यावर त्याला Sit Down अशी कमांड द्यावी. कुत्रा व्यवस्थित बसल्यावर त्याचा बेल्ट त्याच्याभोवती गोल फिरवून अडकवावा. जेणे करून त्याला नीट बसता येईल. 


तुमच्या कुत्र्यालाही बाईकवर बसवण्याचं वेड असेल तर पहिल्यांदा त्याला प्रशिक्षण द्या. त्याशिवाय त्याला बाईकवर बसवण्याच्या फंदात पडू नका... अन्यथा ते तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं