नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवरुन आयफोन डिझाइनबाबत अॅपलचे सीईओ टीम कुक यांच्यावर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी लिहिले की, सध्या असलेल्या स्वाईपपेक्षा आयफोनचे होम बटन कसं चांगलं होतं. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१७ मध्ये आयफोनच्या नवीन मॉडेल डिझाइनमधून, फिजिकल बटन हटवण्यात आलं होतं. त्यावरुनच अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी टीका केली आहे. आयफोन एक्समधून (iPhone X)बटण हटवून त्याजागी स्वाइप कंट्रोल देण्यात आला. त्याचप्रमाणे आयफोन एक्सएस (iPhone XS)आणि आयफोन ११ सीरीजमध्येही होम बटण देण्यात आलेलं नाही.


  




ट्रम्प यांच्या ट्विटनंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिली आहे.