नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर येत असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांच्या कार्यक्रमात काहीसा बदल करण्यात आलाय. ट्रम्प आता गांधी आश्रमाला भेट देणार नाहीत. तसंच ट्रम्प यांचा रोड शो केवळ ९ किलोमीटरचाच असणार आहे. भारत दौऱ्यावर प्रथमच ट्रम्प परिवार मुलगी इव्हांका आणि जावयासह येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांच्या माहितीनुसार अमेरिकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळातही इव्हांका असणार आहे. तसंच इव्हांका आणि तिचा नवरा जेरेड कुश्चर हे ट्रम्प यांचे सल्लागारही आहेत. ट्रम्प परिवार अहमदाबाद आणि त्यानंतर आग्र्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सपत्नीक २४ आणि २५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी निफाडमधील नैताळे गावातील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे आणि पत्नी शोभा साठे या दाम्पत्याने तयारी केलीय.  



डोनाल्ड ट्रम्प यांना गांधी टोपी, उपरणं तसंच मेलनिया ट्रम्प यांच्यासाठी साडी आणि कांदे १३ फेब्रुवारीला पाठवले होते ते आज पोहोचणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यादरम्यान कांदा उत्पादकांना भेटण्याची संधी द्यावी अशी विशेष मागणी केलीय. 


कांदा उत्पादकांना नक्कीच भेटा असा विश्वास व्यक्त करत एक पत्र पाठवण्यात आलंय.