Donald Trump Firing Video : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी एका रॅलीत कोणीतरी अचानक हल्ला केला. या हल्लात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळी झाडण्यात आली. गोळीबार झाल्यानंतर ट्रम्प यांच्या कानाजवळ रक्त दिसून आलं. ट्रम्प यांना तत्काळ मंचावरून खाली उतरवून रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. (donald trump pennsylvania rally shooting video viral)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये शूटरने गोळी कुठून मारली तो व्हिडीओ समोर आला आहे. 



यूएस सीक्रेट सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, शनिवारी ट्रम्प यांच्यावर उघडपणे हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. ज्यामध्ये रॅलीच्या बाहेर एका उंच ठिकाणाहून स्टेजच्या दिशेने अनेक गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 


BNO न्यूजने एक व्हिडीओ शेअर केलाय. शूटरने ट्रंपवर कोठून हल्ला केला हे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. ट्रम्पच्या रॅलीत हल्लेखोराने जवळच्या इमारतीच्या छतावरून गोळीबार केल्याच दिसतंय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हल्लेखोर जवळच्या इमारतीच्या छतावर दिसतोय. गोळ्या झाडल्यामुळे रॅलीत चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत ट्रम्प देखील जखमी झाले आहेत. कानाच्या खालच्या भागात गोळी लागल्याचा सांगण्यात आलंय. त्याच्या कानातूनही रक्त येताना या व्हिडीओमध्ये दिसतंय.


दरम्यान सीक्रेट सर्व्हिसने सांगितले की, या अपघातात ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीर जखमी झालंय. यासोबतच त्याने संशयित हल्लेखोरावर गोळ्या झाडल्या होत्या. 


हल्लेखोराची ओळख पटली


सीएनएनने सीक्रेट सर्व्हिसच्या सूत्राचा हवाला देत सांगितले की, शनिवारी ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोराची ओळख 20 वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रूक्स अशी झाली आहे, असे सूत्रांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितले.



पेनसिल्व्हेनियाच्या बेथेल पार्कच्या थॉमसने पिट्सबर्गच्या अगदी बाहेर बटलरमध्ये बाहेरच्या रॅलीत गोळीबार केला. सूत्रांनी सांगितले की, थॉमसला बटलर फार्म शोग्राऊंडच्या स्टेजपासून 130 यार्डांपेक्षा जास्त अंतरावर एका मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या छतावर दिसले.


डोनाल्ड ट्रम्प घटनेनंतर म्हणाले...


डोनाल्ड ट्रम्प या घटनेवर म्हणाले की, 'आपल्या देशात असं घडू शकतं यावर विश्वास बसत नाही. सध्या हल्लेखोराबाबत कोणतीही माहिती नाही. त्याचा मृत्यू झाला आहे. मला गोळी लागली जी माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला लागली. मला लगेच कळले की काहीतरी गडबड आहे. मला मोठा आवाज ऐकू आला. मला वाटले की गोळी त्वचेला टोचली आहे.'


राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना या घटनेची माहिती देण्यात आली. युनायटेड स्टेट्स सेक्रेटरियल सर्व्हिसचे संचालक, होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी आणि व्हाईट हाऊसचे होमलँड सुरक्षा सल्लागार किम्बर्ली चीटल यांनी त्यांना या घटनेची माहिती देण्यात आलीय.