ट्रम्पचा धक्कादायक निर्णय, पर्यावरण करारातून बाहेर पडण्याचा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पॅरिस पर्यावरण करारातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केलाय. भारत आणि चीनसारख्या देशांना या करारामुळे अवाजवी फायदा होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केलाय.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पॅरिस पर्यावरण करारातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केलाय. भारत आणि चीनसारख्या देशांना या करारामुळे अवाजवी फायदा होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केलाय.
2015मध्ये जगातल्या १९० देशांनी पॅरीसमध्ये ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःची लक्ष्य निर्धारित केली. ही लक्ष्य पूर्ण करण्यासाठी जगभरातली राष्ट्र एकमेकांना आर्थिक आणि तंत्रज्ञानाची मदत करतील असं या करारात म्हटलयं.
दरम्यान, अमेरिकनं निश्चित केलेली लक्ष्य 2025 पर्यंत पूर्ण करायची असतील, तर अमेरिकच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन बेरोजगारी वाढेल असा ट्रम्प यांचा दावा आहे.