मुंबई : यापूर्वी कोणतीही शंका असली, की कोणा मोठ्या किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेण्यासाठी धाव मारली जात होती. पण, आता आपल्या सर्वांमध्येच किंबहुना मोठमोठ्या अभ्यासू व्यक्तींमध्येही सर्वात पहिलं नाव येतंय ते म्हणजे गुगलचं. (Google)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरोबर... गुगल हे सर्च इंजिन तुमच्या कठीण प्रश्नाचंही उत्तर अगदी सोप्या पद्धतीनं देतं. पण, गुगलवर तुम्ही अगदी मोकाटपणे काहीही शोधत असाल तर आताच थांबा. कारण, तुमची हीच सवय थेट तुम्हाला कारागृहात पाठवू शकते. 


इथं पाहा, (Google) वर काय सर्च करु नये? 
चाईल्ड पॉर्न- भारतात चाईल्ड पॉर्नच्या बाबतीत भारतात कठोर कायदे आहेत. ज्यामुळं तुम्ही असं काहीही गुगलवर सर्च केल्यास पोक्सो 2012 कायद्याअंतर्गात कलम 14 अंतर्गत 5-7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. 


बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया - बॉम्ब कसा बनवावा, असं तुम्ही गुगलवर सर्च केल्यास तुमच्या संगणाकाचा आयपी अड्रेस थेट सुरक्षा यंत्रणांपर्यंत पोहोचतो आणि तुमच्यावर कठोर कारवाई केली जाते. 


गर्भपात - गुगलवर गर्भपाताचे पर्याय आणि मार्ग शोधल्यासही तुम्हाला मोठी शिक्षा होऊ शकते. असं केल्यास तुम्हाला कारावासाच्या शिक्षेलाही सामोरं जावं लागेल. 


प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ - फक्त गुगल सर्च नाही, तर एखादा प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडीओसुद्धा परवानगीशिवाय शेअर करणं तुम्हाला कारागृहात पाठवू शकतं. 


पीडितेचं नाव आणि फोटो - अमुक एका व्यक्तीसोबत लैंगिक शोषण झाल्यास त्या पीडितेचं नाव आणि फोटो शेअर करणं अपराध आहे. असं केल्यास तुम्हाला कारावासाची शिक्षा होईल. 


फिल्म पायरसी- एखाद्या चित्रपटाच्या पायरसीशी संबंधित गोष्ट तुम्हाला अडचणीत आणू शकते. असं काहीही सर्च केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. सिनेमेटोग्राफी कायदा 1952 अंतर्गत फिल्म पायरसी आढळल्यास 3 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड अशी शिक्षा आहे.