मुंबई : सध्या श्रावण सुरु असल्यामुळं मांसाहार प्रेमींनी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर बराच ताबा ठेवला आहे. पण, श्रावण नसताना मात्र ही मंडळी चिकन, मटण, मासे या सर्व पदार्थांवर ताव मारताना दिसतात. बहुविध पदार्थ तयार करत त्याचा मनसोक्त आनंद घेण्याकडे अनेकांचाच कल दिसतो. मात्र आपण चिकन, मटण तयार करण्याच्या पूर्वतयारीत कुठेतरी चुका करतोय हे तुमच्या लक्षात येतंय का? (Chicken, Mutton, Fish)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थोडं सुरुवातीपासूनच म्हणायचं झाल्यास चिकन बाजारातून आणल्यानंतर आपण सर्वप्रथम काय करत असू, तर ते म्हणजे नळाच्या पाण्याखाली ते स्वच्छ करण्याचं काम. पुढचा टप्पा असतो ते म्हणजे या स्वच्छ केलेल्या चिकनपासून अपेक्षित पदार्थ तयार करण्याचा. 


( How to clean chicken) चिकन पाण्याने धुवून स्वच्छ केलं म्हणजे त्यावरचे विषाणू निघून गेले असा जर तुमचा समज असेल, तर तसं नाहीये. कारण इथेच तुम्ही चुकताय आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका बळावतोय. 


ब्रिटीश फूड स्टँडर्ड एजन्सीच्या निरीक्षणानुसार मांसावर असणारे विषाणू शरीरात संसर्गानं तुमच्या पोटापर्यंत पोहोचू शकतात. सॅल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टर यांसारखे सूक्ष्म विषाणू बऱ्याचदा चिकन नळाखाली स्वच्छ करत असताना आजुबाजूच्या भांड्यांवर, सुरी, चॉपिंग बोर्डवर, कपड्यांवर लागून त्यावाटे शरीरापर्यंत पोहोचू शकतात. 


वाचा : नोकरी म्हणजे शिक्षाच! टार्गेट पूर्ण न केल्यास खावी लागतात कच्ची अंडी


कॅम्पिलोबॅक्टर शरीरापर्यंत पोहोचल्यास त्यामुळं अतिसार, ताप, उलट्या आणि पोटदुखी या समस्या जाणवू शकतात. यापैकी काही समस्या लगेचच नाहीशा होतात, तर काही मात्र अपवाद ठरतात. 


चिकन नळाखाली पाण्यानं स्वच्छ नाही करायचं मग करायचं तरी काय? 


चिकन पाण्यानं धुण्याऐवजी ते योग्य तापमानावर पूर्णपणे शिजवणं फायद्याचं ठरेल असं मत काही तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. चिकनवरील रक्त, अस्वच्छ घटक टिश्यूपेपरनं टिपून त्या पेपरची विल्हेवाट लावावी. मांस जर फ्रिजमध्ये ठेवत असाल तर ते हवाबंद डब्यांमध्ये फ्रिजरमध्ये ठेवावं. चिकन स्वच्छ केल्यानंतर त्यावर मीठ आणि हळद लावल्यासही विषाणूंचा धोका टळतो.


मांस कापण्यासाठी वापरलेली भांडी, सुरी वगैरे वस्तू स्वच्छ कराव्यात. किंबहुना सिंकही स्वच्छ ठेवावा. या अगदी लहानसहान गोष्टीही मोठा धोका टाळण्यास तुमची मदत करतील.