Corona Variant : नव्या घातक सुपर व्हेरिएंटचं संकट? धोक्याचा इशारा
दोन स्ट्रेन एकाचवेळी हल्ला करु शकतात?
Delta-Omicron Super Variant : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं जगात धुमाकूळ घातलेला असतानाच आता डेल्टा (Delta) आणि ओमायक्रॉनचा (Omicron) एकत्रित सुपर व्हेरियंटचा (Super Variant) धोका निर्माण झाला आहे. मॉर्डना लसीचे मुख्य आरोग्य अधिकारी (chief medical officer) डॉ. पॉल बर्टन (Dr Paul Burton) यांनी हा धोक्याचा इशारा दिला आहे.
जर डेल्टा-ओमायक्रॉन एकाच वेळी कोणाला संक्रमित झाले. तर त्यातून सुपर व्हेरीयंट बनण्याचा धोका आहे. कोरोनाचं संक्रमण होताना सामान्यपणे एका वेळी एकच म्यूटेशन असतो. दुर्मिळ केसमध्ये दोन स्ट्रेन एकाच वेळीही हल्ला करु शकतात. जर हे दोन स्ट्रेन एकाच वेळी पेशींना संक्रमित करत असतील तर ते डीएनएची अदलाबदल करु शकतात. त्यातून नवीन व्हेरीयंट तयार होऊ शकतो.
इंग्लडमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या वाढत असताना डॉ. पॉल बर्टन यांनी सायन्स आणि टेक्नोलॉजी कमिटीला (Science and Technology Committee) याबाबत माहिती दिली. आत्तापर्यंत जीनची अदलाबदलीने बनलेल्या कोरोनाचे तीन स्ट्रेन मिळाले आहेत.
केवळ दोन आठवड्यात ओमायक्रॉन पूर्ण लंडनमध्ये पसरला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार नवीन वर्ष येईपर्यंत संपूर्ण इंग्लंड ओमायक्रॉनच्या विळख्यात असेल. व्हायरसच्या दोन रुपांमध्ये जीनची अदलाबदल शक्य आहे. पण ही शक्यता कमी असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं असलं तरीही या दोन व्हेरियंटमुळे घातक नवा व्हेरियंट जन्माला येऊ शकतो. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून खबरदारी घेण्याची गरज आहे.