मुंबई : ब्रिटनमधील एका न्यायालयानं (British Court) मंगळवारी दुबईतील एका शासकाला Ex Wife आणि मुलांच्या पुढील आयुष्यासाठी एकदोन नव्हे तर, तब्बल 55 कोटी पाऊंड (5525 कोटी रुपये) इतकी भरपाई देण्याचा आदेश दिला. ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळासाठी चाललेला घटस्फोटाचा खटला म्हणून याकडे पाहिलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम (Mohammed bin Rashid Al Maktoum) यांना त्यांची सहावी पत्नी, राजकुमारी हया बिंत अल हुसैन यांना 25.15 कोटी पाऊंड इतकी रक्कम पोटगी स्वरुपात द्यावी लागणार आहे. 


14 वर्षी अल जलीला आणि 9 वर्षीय जायद यांच्यासाठी शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांना 29 कोटी पाऊंडचं बँक गँरंटीसह भरपाई द्यावी लागणार आहे. 


2019 मध्ये नेमकं काय झालेलं? 
न्यायाधीश फिलिप मूर यांनी आपल्या निकालाकत म्हटलं, मुलांना मिळणाऱ्या संपूर्ण 29 कोटी पाऊंड रकमेचा आकडा कमी किंवा जास्त होऊ शकतो. हे विविध कारणांवर आधारलेलं असू शकतं. 


ते किती काळापर्यंत हयात असतील आणि ते आपल्या पित्यासमवेत भेटीगाठी करतात का, असे काही निकष इथं ग्राह्य असतील. 


दरम्यान, 47 वर्षीय राजकुमारी हया बिंत अल हुसैन (Haya bint Hussein) 2019 मध्ये पळून ब्रिटनला पोहोचली होती. जिथं तिनं ब्रिटीश न्यायालयाच्या मदतीनं आपल्या दोन्ही मुलांसाठी सुरक्षिततेची मागणी केली होती. 


जॉर्डनचे दिवंगत राजा हुसैन यांची मुलगी हया यांनी न्यायालयाला सांगितल्यानुसार त्यांना आपल्या पतीची दहशत होती. ज्यांनी आपल्या दोन्ही मुलींना अमिरातमध्ये पुन्हा परतण्याचे आदेश बळजबरीनं दिले होते. 


शेख मोहम्मद (72) हे संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधानही आहेत. त्यांनी राजकुमारीचा फोन हॅक करण्याचेही आदेश दिल्याची बाब न्यायालयात सादर करण्यात आली. पण, हे आरोप त्यांनी फेटाळले. 


जवळपास सात तासांसाठी या खटल्याची सुनावणी सुरु होती. ज्यानंतर आपल्या मुलांना मिळालेल्या या रकमेमुळं त्यांच्या भवितव्यात मोठा हातभार लागणार आहे.


मला या नात्यातून मोकळं व्हायचं आहे आणि मुलांनीही स्वातंत्र्यानं आयुष्य जगावं असंच मला वाटतं असं त्या म्हणाल्या. 


असं म्हटलं जातं की, ब्रिटनमध्ये पोहोचल्यावर एका महिन्यानं हया यांनी शेख यांच्यापासून घटस्फोटाची बाप समोर ठेवली होती. शेख आपल्याला संपवतील, अशी भीती हया यांच्या मनात घर करुन होती.