मुंबई : कोरोना माहामारीने फक्त देशातच नाही तर, संपूर्ण जगात हाहाकार माजवला. 2020 मध्ये संपूर्ण जगात कोरोनामुळे प्रत्येकाच्या जीवनात अनेक बदल झाले. त्यातील एक म्हणजे Work From Home. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना Work From Home करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. Work From Home कल्चरच्या वाढत्या प्रमाणात एक आश्चर्यचकित करणारा रिपोर्ट समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Work From Home दरम्यान ऑनलाईन पॉर्न पाहाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं समोर आलं आहे. सतत ऑनलाइन पॉर्न पाहिल्यामुळे लोक आजारी पडत असल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. 


रिपोर्टनुसार अशा लोकांना लवकरात लवकर उपचार करणे आवश्यक आहे. रिपोर्ट पाहिल्यानंतर लोकांनी सांगितले की, ऑनलाइन पॉर्नवर बंदी घातली पाहिजे. लंडनमध्ये रिमोट वर्किंगमुळे पोर्न पाहण्याचं व्यसन लोकांना लागण्याचं समोर आलं आहे. 


डेली मेलच्या रिपोर्ट्समध्ये, महामारीच्या काळात रिमोट वर्किंग कल्चर लोकप्रिय झालं, या समस्येसाठी वैद्यकीय मदत घेणार्‍या यूके नागरिकांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. तज्ञांच्या मते, पोर्न पाहणं हे लैंगिक व्यसनाचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये लोक आनंददायक संवेदना  विकसित करतात.


ब्रिटनमधील सर्वात मोठ्या सेक्स आणि पॉर्न अॅडिक्शन क्लिनिकने सांगितले की, ते आता अशा काही लोकांवर उपचार करत आहेत ज्यांनी दिवसातील 14 तासांपर्यंत पॉर्न पाहिले आहेत. 


लंडनमधील लॉरेल सेंटरच्या क्लिनिकल डायरेक्टर पाउला हॉल यांनी सांगितलं की, डब्ल्यूएफएच म्हणजे लोक आता पूर्वीपेक्षा अधिक काळ कंप्यूटरसमोर असतात. कंप्यूटरसमोर एकटे असल्याने लोकांमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 


लॉरेल सेंटरच्या रिपोर्टनुसार, 2022 मध्ये पहिल्या सहा महिन्यात जवळपास 750 पॉर्न एडिक्ट लोक समोर आले तर, पूर्ण 2019 मध्ये ही संख्या 950 होती. रिपोर्टनुसार, लंडनच्या क्लिनिकमधील डॉक्टर आता पॉर्न व्यसन असलेल्या लोकांवर उपचार करण्यासाठी महिन्याला सुमारे 600 तास घालवतात, 2019 मध्ये हे प्रमाण केवळ 360 तास होते.