नेदरलॅन्ड - देशाचा पंतप्रधान रस्त्यावर उतरला की त्याच्यासोबत गाड्यांचा ताफा, सुरक्षारक्षकांचा लवाजमा असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण नेदरलॅन्डमध्ये मात्र चित्र काहीसे वेगळे आहे. 


नेदरलॅन्डचे पंतप्रधान मार्क रुते हे राजाला भेटायला चक्क सायकलवरून गेले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल होत आहेत. रूते यांनी राजाच्या महालाबाहेर स्वतः त्यांची सायकल लावली.



 


काही रिपोर्टनुसार, नेदरलॅंडमध्ये हवा दुषित आहे. तेथे हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक आहे. अनेक ठिकाणी हवेतील गुणवत्ता खालावलेली आहे. २०१५ सालपासून तेथील लोकांना दुषित हवेचा सामना करावा लागत आहे. 


२०१० साली मार्क रूते यांनी कार्यभार स्वीकारला. येत्या २६ ऑक्टोबरला मार्क पुन्हा पंतप्रधान पदाची  शपथ घेणार आहेत. ही त्यांच्या कार्यकाळाची तिसरी वेळ आहे.