मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये समुद्रकिनाऱ्याजवळ ८.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. अनेक इमारती आणि घरे कोसळल्याने ३२ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण मेक्सिकोतील टोनाला शहरापासून १०० किमीवर समुद्रात भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाचा धक्का जाणवताच, लोक घरांतून बाहेर पडून रस्त्यांवर आले. अनेक भागांचा वीजपुरवठाही बंद झाला होता. 


भूकंपाची तीव्रता एवढी होती काही अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्यात. त्सुनामीच्या शक्यतेमुळे मेक्सिको आणि अमेरिकेत हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आलाय. 


या भूकंपाचे धक्के ग्वाटेमाला, एल सल्वाडोर, कोर्टारिका, निकारागुआ, पनामा, होन्डुरास आणि इक्वाडोरमध्येही जाणवले. मेक्सिकोमध्ये हा १९८५ नंतरचा सर्वात मोठा भूकंप आहे.