Tajikistan Earthquake : ताजिकिस्तान शक्तिशाली भूकंपाने हादरलं; चीनलाही बसला हादरा..
Tajikistan Earthquake : तुर्कीच्या भूकंपातून जग सावरत नाही तोच आणखी एका भूकंपाची नोंद झाली आहे. जगातील विविध देशांमध्ये सातत्यानं भूकंप का येत आहेत? युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व ताजिकिस्तानमधील Murghob पासून 67 किमी अंतरावर होता.
Earthquake In Eastern Tajikistan: तुर्कीतील (Turkey Earthquake) भूकंपाच्या जखमा भरून निघालेल्या नसतानाच आता आणखी एका देशाला भूकंपाचा हादरा बसल्याचं वृत्त समोर आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार ताजिकिस्तान या देशाच्या पूर्व भागाला (Eastern Tajikistan) भूकंपाचे हादरे बसले आहेत.
प्राथमिक स्तरावर अद्यापही या भूकंपातून कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाबी. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व ताजिकिस्तानमधील Murghob पासून 67 किमी अंतरावर होता.
हेसुद्धा वाचा : Viral VIDEO: हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या करोडपतीनं महिला वेटरला दिली चक्क 8 लाख रूपयांची टीप
का येतो भूकंप?
पृथ्वीच्या अंतर्भागात 7 थर असून हे थर सतत फिरते असतात. पण, काही भाग असेही आहेत जिथं हे थर एकमेकांवर आदळतात. या प्रकाराला झोन फॉल्ट लाईन असंही म्हटलं जातं. सातत्यानं एकमेकांवर आदळल्यामुळं त्यांच्या कोपऱ्यांचा आकार बदलतो. अनेकदा दाब वाढल्यामुळं हे थर तुटू लागतात. ज्यामुळं भूर्भातील उर्जा बाहेर निघण्यासाठी वाट शोधते आणि यामुळंच भूकंप येतात.
कोणता भूकंप किती नुकसानदायक?
9 आणि त्याहून अधिक तीव्रता- मोठं नुकसान. खुल्या मैदानात असणाऱ्या व्यक्तीला पृथ्वीचा पृष्ठ अस्थिर होताना दिसतो.
8 ते 8.9 तीव्रता - इमारती आणि मोठे पूल कोसळतात. त्सुनामीचा धोकाही संभवतो.
7 ते 7.9 तीव्रता - इमारती कोसळतात. जमीनीत असणाऱ्या जलवाहिन्या फुटतात.
6 ते 6.9 तीव्रता- इमारतींच्या पायाला नुकसान पोहोचतं. वरच्या मजल्यांचं नुकसान होतं.
5 ते 5.9 तीव्रता - फर्निचर हादरू लागतं.
4 ते 4.9 तीव्रता - भींतीवर टांगलेल्या फ्रेम पडतात. खिडक्या तुटतात.
3 ते 3.9 तीव्रता - एखादं मोठं वाहन बाजुनं गेल्यास आपण हादरतो असं जाणवतं.
2 ते 2.9 तीव्रता - धरणीकंप जाणवतो
0 ते 1.9 तीव्रता - फक्त सीज्मोग्राफवर ही कंपनं जाणवतात.