Viral VIDEO: हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या करोडपतीनं महिला वेटरला दिली चक्क 8 लाख रूपयांची टीप

Billionaire Gives 8 Lakh Rupees to Lady Waiter As Tip: वाढणाऱ्या वेटर्सनाही आनंद होतो की आपण वाढत असलेला पदार्थ कोणाला तरी आवडतो आहे. असा एक गोड प्रसंग एका महिला वेटरसोबत घडला आहे. तो पाहून चक्क तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.

Updated: Feb 22, 2023, 11:06 PM IST
Viral VIDEO: हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या करोडपतीनं महिला वेटरला दिली चक्क 8 लाख रूपयांची टीप title=

Billionaire Gives 8 Lakh Rupees to Lady Waiter As Tip: रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपल्याला हरतऱ्हेचे पदार्थ खायची इच्छा असते. त्यातून आपल्याला आपल्या मनासारखं जेवण खायला मिळालं तर आपला आनंद तर गगनात मावेनासा होतो. आपल्याला जे आपल्या घरी खायला मिळत नाही आणि तेच जर का आपण आपल्या आवडत्या हॉटेलमध्ये खाल्लं तर आपण पुन्हा पुन्हा त्याच रेस्टॉरेंटमध्ये (Viral Video) जातो फक्त ती एक डीश खाण्यासाठी. तिथले वॅटर्सही (Female Waiter) आपल्याला आवडीनं पदार्थ सर्व्ह करतात तेव्हा आपल्यालाही मग ते पदार्थ कुणी प्रेमानं सर्व्ह केल्यानंतर अजूनच आवडू लागतात. तेव्हा वाढणाऱ्या वेटर्सनाही आनंद होतो की आपण वाढत असलेला पदार्थ कोणाला तरी आवडतो आहे. असा एक गोड प्रसंग एका महिला वेटरसोबत घडला आहे. तो पाहून चक्क तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. (viral video Billionaire Gives 8 Lakh Rupees to Lady Waiter As Tip lady starts crying after receiving the money)

ही घटना ऑस्ट्रेलियामधील आहे. तेथील एक हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या करोडपतीनं चक्क एका महिलेला 8 लाख रूपयांची टीप दिली आहे. त्यामुळे ही महिला भलतीच खूश झाली आहे. तिनं नावं लॉरेन असं आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तिनं व्हिडिओत म्हटलं आहे की तिला विश्वासच बसत नाहीये की कोणीतरी तिला एवढी मोठी टीप दिली आहे. (lady waitrer gets 8 lakh tip)

लॉरेन ही एक युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे आणि पोटापाण्यासाठी, खर्च भागवण्यासाठी तिनं रेस्टॉरंटमध्ये काम करते. तिनं 42 हजार रूपयांची डीश आणली आणि ती डीश एक करोडपती प्रचंड आवडली आणि त्यानं तिला चक्क 8 लाख रूपयांची टीप दिली. तिनं वाढलेलं जेवण त्या करोडपतीला इतकं आवडले की त्यानं चक्क तिला इतक्या मोठ्या रूपयांची अमांऊट दिली. परंतु तिचा मोठेपणा इतका की तो पाहून तुम्हाही भारावून जाल. 

तिनं तिला मिळालेले सगळे पैसे आपल्याच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना वाटले, तिच्या मते, आपण एकटी या पैशांचे काय करणार म्हणून तिनं ही सगळी अमांऊट आपल्याच मित्र परिचितांमध्ये वाटली आणि तिनं सगळ्यांची मनं जिंकून घेतली. सध्या हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ मेलबर्नचा (restaurant in australia) आहे. त्यामुळे या व्हिडीओला पाहून अनेकांना कमेंट्स लिहिले आहेत आणि त्या महिला वेटरचं कौैतुकही केले.