Viral News: सध्या इंटरनेटचा वापर इतका वाढला आहे की, अनेकजण तर खरेदीसाठीही घऱाबाहेर पडत नाहीत. तुम्ही घरबसल्या सर्व सामान मागवू शकत नसल्याने, फार तसदी घेण्याच्या भानगडीत पडत नाही. अगदी कंगव्यापासून ते मोबाईलपर्यंत सर्व काही तुम्ही ऑनलाइन मागवू शकता. यासाठी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर केला जातो. दरम्यान, एका घटनेत 8 वर्षाच्या मुलाने चक्क AK-47 ची ऑर्डर दिली. डार्क वेबवरुन त्याने ही ऑर्डर दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे त्याला AK-47 ची डिलिव्हरीही करण्यात आली. मुलाच्या आईनेच या घटनेचा उलगडा केला आहे. नेदरलँडमध्ये ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेने दावा केला आहे की, तिच्या 8 वर्षीय मुलाने तिला अजिबात कल्पना न देता AK-47 ची खरेदी केली. या रायफलची डिलिव्हरी जेव्हा घऱी करण्यात आली, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर महिलेने तात्काळ मुलाकडून याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की, यामागे इंटरनेटमधील काळं जग असणारं डार्क वेब जबाबदार ठरलं आहे. डार्क वेबवर निर्धास्तपणे बेकायदेशीर कामं केली जातात. 


डार्क वेब काय आहे?


डार्क वेब हा इंटरनेटचा असा भाग आहे, जेथील कंटेट मिळवण्यासाठी Google, Bing अशा सर्च इंजिनच्या मार्फत पोहोचू शकत नाही. यासाठी स्पेशल ब्राऊजर आणि परवानगीची गरज असते. डार्क वेबवरील कंटेंट कोणत्याही कायदेशीर अख्त्यारित येत नाही. येथे ड्रग्ज, शस्त्रं यासह अनेक बेकायदेशीर कामं केली जातात. हे Onion Routing तंत्रज्ञानावर काम करतं, जो युजर्सला ट्रॅकिंग आणि सर्व्हिलन्सपासून वाचवतं. 


डार्क वेबवर असे अनेक स्कॅमर्सही असतात, जे बंदी असणाऱ्या वस्तू अगदी स्वस्तात येथे विकतात. लोक स्वस्तात खरेदी करण्याच्या नादात अनेकदा लाखो रुपये गमावून बसतात. अशाच एखाद्या स्कॅमरच्या जाळ्यात हा मुलगा अडकला आणि त्याने ऑनलाइन रायफलची ऑर्डर देऊन टाकली. 


दरम्यान बारबरा जेमेन यांनी युरोन्यूजला मुलाखत दिली असून, त्यामध्ये मुलगा सायबर क्राइममध्ये कसा फसला याची माहिती दिली आहे. महिलेने सांगितलं की, तिचा मुलगा संगणकावर फार वेळ घालवतो. फार कमी वयात त्याने हॅकिंग सुरु केलं होतं. दरम्यान, यावेळी त्यांनी काही हॅकर्सनी मनी लाँड्रिंगसाठी मुलाचा वापर केल्याचं म्हटलं आहे. 


बारबरा जेमेन यांनी यावेळी सांगितलं की, जेव्ही आम्ही मुलाच्या खोलीत जायचो तेव्हा तो ऑनलाइन गेम खेळताना कोडवर्डमध्ये बोलत असते. पण त्याने AK-47 मागवल्याचं पाहून आम्हाला धक्का बसला. मुलाने सीमा शुल्क वाचवण्यासाठी बंदूक पोलंडमधील बुल्गारिया येथे पाठवली आणि नंतर नेदरलँडला पोहोचली. 


दरम्यान बारबरा यांनी बंदूक स्थानिक पोलिसांकडे सोपवली असल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी चौकशी केली असून माझ्या मुलाविरोधात कारवाई करणार नसल्याचं सांगितलं आहे. तपासात तो आंतरराष्ट्रीय हॅकर्सच्या जाळ्यात अडकल्याचं उघड झालं. बारबरा यांनी आता स्वत:ला सायबर सुरक्षेत सुशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्या डच पोलिसांच्या सायबर सेलमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.