Elon Musk : टेस्लाचे (tesla) सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरची (twitter) सूत्रे हातात घेताच अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. ट्विटरचा लोगो बदलल्यानंतर मस्क यांनी ट्विटरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने गुरुवारी सर्व व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक (Blue Tik) काढून टाकले आहे. त्यामुळे आता पैसे मोजून ब्लू टिक घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ज्यांनी ब्लू टिक प्लॅनचे पैसे भरले नाहीत त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ब्लू टिक्स काढून टाकण्यात आले आहेत. मस्कने वेबसाईटवरून पेमेंट करणाऱ्यांसाठी 8 डॉलर प्रतिमहिना तर मोबाईल अॅपवरून पैसे भरणाऱ्यांसाठी 11 डॉलर प्रतिमहिना असे दर आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दुसरीकडे गुरुवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मस्कला मोठा धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BQ PRIME च्या अहवालानुसार,  एलॉन मस्क यांच्यासाठी गेले 24 तास अतिशय नुकासानीचे ठरले आहेत. गेल्या तिमाहीत आलेल्या निकालांमुळे टेस्ला इंकचे समभाग घसरले. तसेच स्पेसएक्सचे (SpaceX) स्टारशिप रॉकेट उड्डाणानंतर काही वेळातच फुटले. यानंतर ट्विटरवरील लाखो युजर्सची ब्लू टिक्स काढून टाकणे मस्कसाठी खूप महागडे ठरले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, गेल्या 24 तासांत मस्कच्या संपत्तीत 12.6 अब्ज डॉलरची घट झाली आहे. ही घट या वर्षातील आतापर्यंतची सर्वात मोठी घट असल्याचे म्हटले जात आहे.
 
टेस्लाचे शेअर घसरल्याने मस्क यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. त्यांच्या शेअरची किंमत 9.75 टक्क्यांवरुन घसरून 162.99 डॉलरवर आली. दुसरीकडे स्पेसएक्सचे स्टारशिप रॉकेट टेक्सासमधील बोका चिका बीचवरुन लॉन्च झाल्यानंतर चार मिनिटांनी फुटले. दोन्ही कंपन्यांचे एलॉन मस्क हे व्यवस्थापकीय संचालचक आहेत. स्पेसएक्सच्या मोहिमेला अपयश आले तरी मस्कने कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले होते.


एलॉन मस्क जगातील दुसरी श्रीमंत व्यक्ती


फ्रेंच लक्झरी टायकून बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्यानंतर एलॉन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षी टेस्लाच्या 32 टक्के नफ्यामुळे त्यांच्या संपत्तीत 26.8 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.


दरम्यान, मस्क यांनी याआधीच लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक काढून टाकण्याची घोषणा केली होती. एप्रिलपासून व्हेरिफाइड अकाऊंटमधून लेगसी ब्लू टिक मार्क काढून टाकले जाईल, असे त्यांनी सांगितले होते. जर ब्लू टिक हवे असेल तर दरमहा पैसे द्यावे लागणार आहेत. मस्क यांनी घोषणा केल्यानंतर अनेकांची ब्लू टिक गेली आहे. यामध्ये बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, काँग्रेस नेते राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिकही हटवण्यात आली आहे.