Elon Musk Took Wegovy For Fitness: जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांच्या फिटनेसबाबत प्रत्येकालाच आश्चर्य वाटतं. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या एलन मस्क यांना अनेकदा नेटकरी फिटनेसवरून प्रश्न विचारतात. एका युजर्सनं त्यांना त्यांच्या फिटनेस रहस्य विचारलं होतं. तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही व्यायाम आणि डाएड फॉलो करता का? त्या प्रश्नावर रिप्लाय देताना फिटनेसचं (Fitness) गुपित उघड केलं आहे. त्यांनी दिलेलं उत्तर वाचून अनेकांचं डोकं चक्रावून गेलं आहे. मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये फास्टिंग आणि वीगोवी (Fasting And Wegovy) असं लिहिलं आहे. फास्टिंगबाबत तर सर्वांनाच माहिती आहे. मात्र वीगोवी नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न पडला आहे. चला तर जाणून घेऊयात वीगोवी म्हणजे काय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीगोवी एक औषध असून अमेरिकन फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननं गेल्या वर्षी मान्यता दिली आहे. वीगोवी ही डॅनिश फार्मास्युटिकल कंपनी Novo Nordisk च्या सेमाग्लूटाइड औषधाचं अपडेटेड वर्जन आहे.या औषधामुळे वजन कमी करण्यास मदत होते. या औषधाचा वापर मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी केला जातो. मात्र आता वजन कमी करण्यासाठी या औषधाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या औषधामुळे भूक तयार करणारे हार्मोन नियंत्रणात राहतात. 



एलन मस्क यांच्या खुलाशानंतर सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. एलोन मस्क वयाच्या 51 व्या वर्षीही 30 वर्षांच्या तरुणासारखा दिसतात. आता इतरही अनेक लोक या औषधाचा वापर करताना दिसतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेतलं जाऊ शकते. अनेक सेलिब्रिटींनीही वजन कमी करण्यासाठी या महागड्या औषधाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे औषधाची कमतरताही जाणवू लागली आहे.