Elon Musk UFO Plane : ध्वनीचा वेग हा जगात सर्वात शक्तीशाली आहे. मात्र, आता लवकरच मानव ध्वनीच्या वेगाने प्रवास करु शकणार आहे. या कोणत्या काल्पनिक सिनेमाचा एखादा सीन नाही. ही कल्पना प्रत्यक्षात साकारणार आहे.  एलॉन मस्क नेहमीच काही ना काही तरी भन्नाट करत असतात. आता  एलॉन मस्क  ध्वनीपेक्षा वेगवान प्रवास करणारे UFO Plane लाँच करणार आहेत. या UFO Plane च्या माध्यमातून 15 तासांचा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण होणार आहे. म्हणजेच   फक्त 30 मिनीटांत दिल्लीतून अमेरिका गाठता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युनिलाड टेकच्या अहवालानुसार  एलॉन मस्क UFO Plane लाँच करण्याच्या तयारीत आहेत. UFO Plane हे स्टारशिप अंतर्गत तयार केले जाणारे एक प्रकारचे स्पेसक्राफ्ट असणार आहे. यामुळे यातून होणारा प्रवास सर्वसामान्य विमाना प्रवासासारखा नसेल. एलॉन मस्क यांनी SpaceX Polaris Dawn मिशन लाँच केले आहे. या मोहिमेअंतर्गत थेट अंतराळात फिरण्याची संधी मिळणार आहे. या प्रोजेक्टसह एलॉन मस्क UFO Plane लाँ करणार आहेत. अनेक तासांचा विमान प्रवास हा अवघ्या काही मिनीटांत पूर्ण होणार आहे. एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने 395 फुटांचे अंतराळयान तयार केले आहे, जे स्टेनलेस स्टीलचे आहे. अर्थात, स्टीलचे बनलेले असल्याने ते खूप हलके असेल. यातूनच जलद हवाई प्रवास केला जाणार आहे. 


लॉस एंजेलिस ते टोरंटो हे 4,061 किलोमीटरचे अंतर अवघ्या 24 मिनिटांत पूर्ण होणार आहे. विमानाने हे अंतर कापण्यासाठी 4.40 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. त्याचप्रमाणे, लंडन ते न्यूयॉर्क हे 5,567 किलोमीटरचे अंतर देखील केवळ 29 मिनिटांत पार करता येणार आहे. विमानाने हे अंतर पार करण्यासाठी सध्या 8 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को हे 12,341 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सध्या विमानाने 15.35 तास लागतात. मात्र, आता हे अंतर फक्त 30 मिनिटांत पूर्ण करता येते. तसेच न्यूयॉर्क ते शांघाय हे 11,858 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सध्या फ्लाइटने 14.50 तास लागतात. आता हे अंतर फक्त 39 मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.