Twitter ला मिळाली नवी CEO; Elon Musk यांनी जाहीर केलं नाव!
Twitter New CEO Linda Yaccarino: जगातील सर्वात प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरला (Twitter) नवी सीईओ (CEO) मिळाली आहे. लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) या ट्विटरच्या नव्या सीईओ असतील.
Twitter New CEO Linda Yaccarino: जगातील सर्वात प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरला (Twitter) नवी सीईओ (CEO) मिळाली आहे. लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) या ट्विटरच्या नव्या सीईओ असतील. ट्विटरचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 44 अब्ज डॉलरला ट्विटर विकत घेतलं होतं. दीर्घ करार प्रक्रियेनंतर त्यांनी अखेर ट्विटर विकत घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाचे बदल केले होते. अशातच मस्क यांनी ट्विट करत लिंडा याकारिनो यांचं कौतूक केलंय.
काय म्हणाले Elon Musk?
मी ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनो (Twitter New CEO Linda Yaccarino) यांचं स्वागत करण्यास उत्सुक आहे. लिंडा प्रामुख्याने व्यवसाय ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित करेल, तर मी उत्पादन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करेन. प्लॅटफॉर्मला सर्व गोष्टी अॅप X मध्ये रूपांतरित करण्यासाठी लिंडासोबत काम करण्यास उत्सुक आहे, असं इलॉन मस्क यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
आणखी वाचा - Elon Musk यांच्या मनात दडलंय काय, Twitter विकण्याची तयारी?
येत्या 6 आठवड्यांत लिंडा याकारिनो कामावर रुजू होतील. याकारिनोने गेल्या महिन्यात मियामी येथे एका जाहिरात परिषदेत मस्कची मुलाखत घेतली. या परिषदेत याकारिनो यांनी मस्कच्या कार्य नैतिकतेचं कौतुक केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी नियुक्ती केल्याने ट्विटरचे कर्मचारी आनंदात असल्याचं दिसून येतंय.
कोण आहेत Linda Yaccarino?
लिंडा याकारिनो या एनबीसी युनिव्हर्सल मीडिया एलएलसी येथे ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग आणि पार्टनरशिप्सच्या अध्यक्षा आहेत. लिंडा याकारिनो यांनी कंपनीसाठी वन प्लॅटफॉर्म तयार केला होता. या प्लॅटफॉर्मद्वारे प्लॅटफॉर्म जाहिरातदारांना सर्व स्क्रीन आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. गुगल असो वा अॅपल यांसारख्या ब्रँडसोबत लिंडा यांनी काम केलंय. तसेच फॉर्च्युन, फोर्ब्स यासारख्या पब्लिकेशनने शक्तीशाली महिला म्हणून त्यांची निवड देखील केली होती.
दरम्यान, इलॉन मस्क सीईओ पदाचा राजीनामा दिलाय, मात्र ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य प्रौद्योगिक अधिकारी म्हणून मस्क काम करणार आहेत. त्यामुळे आता आगामी काळात मस्क पुन्हा मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.