Trending News : सोशल मीडियावर एका जोडप्याची प्रेमकहाणी (Love Story) सध्या चांगलीच व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. तब्बल चार दशकांनी या प्रेमीयुगुलाने लग्न केलं. या दोघांची पहिली भेट 1971 साली कॉलेजमध्ये झाली होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं त्यानंतर त्यांनी एकमेकांना 7 वर्ष डेट केलं. आता प्रेयसी 69 वर्षांची तर प्रियकर 73 वर्षांचा आहे. तब्बल चाळीस वर्षांनंतर ते एकमेकांना भेटले. (woman marries her love after 42 years)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियकराचं नवा स्टीफन (Stephen) असं आहे तर प्रेयसीचं नाव जीन वाट्स (Gene Watts) असं आहे. दोघंही अमेरिकेत (America) राहणारे आहे. स्टीफन आणि जीनचं एकमेकांवर प्रचंड प्रम होतं. दोघांनी लग्नाचाही निर्णय घेतला. पण जीन वाट्सच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. कारण स्टीपन हा अश्वेत होता. जीनच्या आईने लग्नाला प्रचंड विरोध केल्याने अखेर या दोघांनाही प्रचंड मानसिक धक्का बसला.


कुटुंबाच्या विरोधानंतरही काही वर्ष ते एकमेकांना भेटत होते. पण त्यांनी लग्न केलं नाही. कालांतराने नोकरीनिमित्ताने दोघं वेगवेगळ्या शहरात गेले आणि मग दोघांचं भेटणंही कमी होत गेलं. दोघांनी एकमताने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि ते कायचे दुरावले गेले. पण म्हणतात ना लग्नाच्या गाठी या वर स्वर्गात बांधलेल्या असतात.


चाळीस वर्षांनी झाली भेट
मधल्या काळात जीनचं लग्न झालं, पण काही वर्षातच तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती एकटीच राहू लागली. पण 2021 मध्ये एक प्रसंग घडला आणि दोघंही एका वळणावर आमने सामने आले. पण परिस्थिती खूपच बदलली होती. जीन काही कारणासाठी एका रुग्णालयात गेली होती, तिथे तिला स्टीफन उपचार घेत असल्याचं दिसलं. स्टीफनला ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आला आणि तो कायमचा व्हिलचेअरला चिकटला. स्टीफनला पाहून जीनच्या डोळ्यात अश्रू तरळले. तीने प्रेमाने त्याची विचारपूस केली. जीनला पाहून स्टिफनही भावूक झाला. 



पण जीनने स्टीफनला एकटं सोडलं नाही. ती त्याला आपल्या घरी घेऊन आली आणि त्याची सेवा करु लागली. नुकतंच या दोघांनी लग्न ही केलं. जीनला आपल्या तरुणपणातलं प्रेम पुन्हा मिळालं. आता आयुष्यभर स्टीफनची साथ न सोडण्याचा निर्णय जीनने घेतला असून दोघंही आनंदात आहेत.