Facebook ला 10700 कोटींचा दंड, युर्जर्सचा वैयक्तिक डेटा दुसरीकडे ट्रान्सफर केल्याचा गंभीर आरोप
यापूर्वी देखील फेसबुकवर डेटा चोरी तसेच डेटाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आता मेटावर डेटा ट्रान्सफर झाल्याचा आरोप झाला असून दंड देखील ठोठावण्यात आला आहे.
Meta Fined By EU: फेसबुकची मूळ कंपनी मेटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. युर्जर्सचा वैयक्तिक डेटा दुसरीकडे ट्रान्सफर केल्याचा गंभीर आरोप मेटावर करण्यात आला आहे. या प्रकरणी युरोपियन युनियनने मेटाला 10700 कोटींचा दंड ठोठवला आहे. मेटाने युर्जर्सच्या प्रायव्हसी पॉलिसीचा भंग केला आहे. युर्जर्सचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवण्यात मेटा अपयशी ठरल्याचे युरोपियन युनियनचे म्हणणे आहे. मेटावर झालेल्या या कारवाईमुळे Facebook चा वापर करणाऱ्या युर्जर्सचा वैयक्तिक डेटा किती सुरक्षित आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे (Meta Fined By EU).
सोशल मीडिया कंपनी मेटा युजर्सचा डेटा यूएसमध्ये ट्रान्सफर करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आयर्लंडच्या डेटा प्रोटेक्शन कमिशनने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. मेटा कंपनीने लोकांच्या मूलभूत अधिकारांची आणि स्वातंत्र्यांची पर्वा न करता अटलांटिकमध्ये डेटा ट्रान्सफर केल्याचा दावा आयर्लंडच्या डेटा प्रोटेक्शन कमिशनने केला आहे.
मेटाला अल्टीमेटम
यापूर्वी डेटा चोरी प्रकरणात amazon ला 6,688 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. मेटाला 10700 कोटींचा दंड ठोठवण्यात आला आहे. EU नियामकांनी मेटाला यूएसमध्ये वैयक्तिक डेटा हस्तांतरित करणे थांबवण्यासाठी पाच महिन्यांची मुदत दिली आहे.
पाच कोटी फेसबुक यूझर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर झाल्याचा आरोप
यापूर्वी पाच कोटी फेसबुक यूझर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर झाल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं माफीनामा सादर केला होता. फेसबुकच्या यूझर्सनी शेअर केलेली माहिती जपण्याची जबाबदारी कंपनीची आहे. जर, अशी माहिती लीक झाली असेल, तर ती कंपनीची चूक आहे. असं झुकरबर्गनं त्याच्या फेसबुक पेजवर म्हटले होते. शिवाय यापुढे, अशी डेटा चोरी होऊ नये याची खबरदारी घेतली जाईल असंही झुकरबर्गनं स्पष्ट केले होते.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीच्या काळात फेसबुकच्या पाच कोटी यूझर्सची खासगी माहिती केम्ब्रिज अॅनालिटीका नावाच्या एका कंपनीनं वापरली. त्याआधारे नागरिक मतदानात कोणत्या पक्षाला करतील याचा अंदाज बांधल्याचं अमेरिकन तपास यंत्रणांच्या चौकशीत पुढे आलंय. प्रकरण उघड झाल्यापासून फेसबुककडून कुणीही प्रतिक्रिया दिली नव्हती. बुधवारी झुकरबर्ग आणि त्याच्या कंपनीच्या सीईओ सीरील सँडबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली दिलगिरी व्यक्त केली होती.