सुशांत पाटील / मुंबई : गेल्या २ जानेवारीला सूर्यावर जबरदस्त स्फोट झाले. (Explosion on sun) या स्फोटांचे परिणाम पृथ्वी आणि पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या यंत्रणेवर होणार आहे. ( The blasts will affect the Earth and the system of artificial satellites orbiting the Earth) ब्रह्मांडात नेमकं काय घडत आहे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०२१ या नव्या वर्षांची सुरूवातच मोठी धमाकेदार झाली आहे. आपल्या सौर मंडळातील ताऱ्यावर म्हणजेच सूर्यावर दक्षिण गोलार्धात गेल्या 2 जानेवारीला जोरदार स्फोट झाले. या स्फोटाचे विपरित परिणाम पृथ्वीवरही होऊ शकतात, असा धोक्याचा इशारा नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेनं दिला आहे.


या स्फोटादरम्यान बाहेर पडलेले सौरकण अंतराळात विखुरले गेलेत. नासाच्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरीनं ते दृश्य कॅमेऱ्यात टिपले गेले आहे. हे सौरकण पृथ्वीकडे आल्यास उपग्रह, जीपीएस नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाईट टी.व्ही.च्या कार्यात बाधा येऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


याआधी २९ एप्रिल २०१५ आणि ३० जुलै २०११ रोजी देखील सूर्यावर अशाचप्रकारचे स्फोट झाले होते. मात्र त्यावेळचे स्फोट आणि आता झालेले स्फोट यात थोडा बदल आहे.


सूर्यावर नुकतेच झालेले स्फोट ही खगोलशास्त्राच्या दृष्टीनं नियमित घटना आहे. अशाप्रकारच्या घटना आकाशगंगेत वारंवार घडत असतात. मात्र त्याचा नेमका पृथ्वीवर परिणाम होतो की नाही, हे पाहण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.