Viral News : नवरा बायकोमधील (husband wife) नात्याचा मूळ असतो तो म्हणजे विश्वास...एकमेकांवर काय प्रेम करु आणि एकनिष्ठ राहू असं लग्नाच्या विधीवेळी आपण वचन देतो. पण जेव्हा या दोघांमध्ये तिसरा येतो तेव्हा त्या विश्वासाला तडा जातो. ज्या माणसावर आपण प्रेम करतो तो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसतो तेव्हा (Extramarital Affair) आपण तुटून जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांच्या घरात अगदी सगळ्यांकडे घर कामासाठी मोलकरीण (maid) असते. घरातील स्त्रीयांचं या बाईंशिवाय जगच अडतं. आजकाल महिला (women) या घराबाहेर पडून काम करतात. त्यामुळे घर आणि ऑफिस या दोघांची कसरत करत असताना घरातील कामांमध्ये मोलकरीण मदत करतं असते. या मोलकरीणीवर मालकरीण बाईचा पूर्ण विश्वास असतो. पण जर याच मालकरीणीने दगा दिला तर...असंच एक प्रकरण समोर आलं आहे. 


दोघात तिसरा..!


आपल्या नवऱ्यांचं घरातील महिला सफाई कामागारासोबत सूत जुळलं (Extramarital Affair with maid ) आहे हे बायकोला कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकते. एकेदिवशी जेव्हा मोलकरीणी कारमध्ये कोणाची तरी वाट पाहत होती तेव्हा ती महिला तिथे पोहोचली आणि तिला शिवीगाळ करु लागली. मोलकरीणीने सुद्धा महिलेसोबत वाद घातला. मला तुझ्या नवऱ्याची गरज नाही, असं म्हटल्यावर महिलेचा पारा चढला. त्यानंतर या दोघींमध्ये तुंबळ मारामारीही झाली. 


 


हेसुद्धा वाचा - Viral Video : प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने उचलले धक्कादायक पाऊल; मुलीला थेट उचलूनच...


 


कुठे घडली ही घटना? 


हे प्रकरण ऑस्ट्रेलियातील (Australia) आहे. तर जॅकलिन मेरी मॉरिसला (Jacqueline Marie Morris) असं त्या वैवाहिक महिलेचे नाव आहे. साधारण ऑगस्टमध्ये मॉरिसला त्याचा नवऱ्याच्या अफेअरबद्दल कळलं होतं. मॉरिसला दोन मुलं देखील आहेत. आता हे प्रकरण न्यायालयात आहे. मॉरिसने न्यायालयात मोलकरीणीला मारामारी केल्याबद्दल स्पष्टीकरण दिलं. त्यात ती म्हणाली की मोलकरीणीनेच मला भडकावलं त्यामुळे मी हे कृत्य केलं. तुझ्या पतीसोबत रोमान्स (Romance) कसा करायचा ते आधी शिक, असं म्हटल्यामुळे मी तिला मारलं असं तिने कोर्टात सांगितलं. ती मोलकरीण मॉरिसकडे तब्बल चार वर्षांपासून कामाला होती. (Extra Marital Affair Husband Affair With Maid Learn How To Romance with Husband When Caught Red-Handed Advice To Wife Australia news)


 


हेसुद्धा वाचा - Video : बायको गेली नवऱ्याला Surprise द्यायला आणि मग...


 


जिला जगण्यासाठी कामावर ठेवलं विश्वास ठेवला त्याच महिलेने मॉरिसचा संसार तोडला. अशा घटनासमोर आल्या की मन अस्वस्थ व्हायला होतं. जगात काय सुरु आहे हे कळतं नाही. नेमका विश्वास ठेवायचा तरी कोणावर आणि किती...असा प्रश्न पडायला लागतो. पण सगळीच माणसं सारखी नसतात काही लोक काही नातं नसताना रक्ताचे संबंध नसताना एकमेकांवर जीवापाड जीव लावतात. अशादेखील अनेक स्टोरी आपण ऐकल्या, बघितल्या किंवा वाचल्या आहेत.