Video : बायको गेली नवऱ्याला Surprise द्यायला आणि मग...

Viral Video : सोशल मीडिया  (Social Media)  प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (instagram) एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) समोर आला आहे. या व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. नवऱ्याला Surprise देणं बायकोला महागात पडलं आहे.   

Updated: Nov 28, 2022, 11:27 AM IST
Video : बायको गेली नवऱ्याला Surprise द्यायला आणि मग... title=
Wife Returns From Military To Husband Surprise but Wife Catches Husbands Extra Marital Affair instagram video nmp

Extra Marital Affair :  आयुष्यात अनेक वेळा आपण कधी ज्या गोष्टींचा विचारही करत नाही अशी काहीशी घटना घडतात...आणि क्षणात आयुष्य पलटून जातं. लग्न (marriage) म्हटलं की प्रेम, आदर आणि विश्वास या तीन गोष्टींवर हे नातं पुढे जातं असतं. नवरा बायको (husband wife Video) एकमेकांसाठी अनेक गोष्टी करतात. प्रेमात एकमेकांसाठी कधी गिफ्ट देणे, एखादी रोमाँटिक डेट (romantic date) प्लन करणे, कधी Surprise देतात. पण एका महिलेला कधी स्वप्नातही विचार केला नसेल नवऱ्याला Surprise देणे तिच्यासाठी एवढं मोठं दुख घेऊन येईल ते. 

नवऱ्याला Surprise द्यायला गेली आणि...

मिलटरीमध्ये (Military) देशाच्या सेवेसाठी कार्यरत असलेली बायको जेव्हा नवऱ्याला Surprise द्यायला येते तेव्हा तिच्या पायाखाली जमीनच सरकते. झालं असं की, अनेक दिवसांनंतर मिलटरीमध्ये असणारी महिला नवऱ्याला Surprise देण्यासाठी तिच्या कारच्या डिकीत बसते. तिचा एक सहकारी हा सुंदर क्षण टिपण्यासाठी दुसऱ्या कारमधून (car Video) त्यांचा पाठलाग करतो आणि सगळं कॅमेऱ्यात (Camera) कैद करतो.  

हेही वाचा -  Photoshoot : पालकांनी नाकारलं, कोर्टाने न्याय दिला; 'या' Lesbian Couple फोटोशूटची सर्वत्र चर्चा

नवऱ्याची कार पुढे निघते,  तोही मागे जातो...पण हे काय तो माणूस त्याचा घरी न जातो कोणाच्या घरी जातोय आणि तेही एवढं सामान घेऊन. थोड्याच वेळात गाडी थांबते आणि तिथे एक तरुणीने येते. तरुणी आणि तो व्यक्ती कारची कार डिक्की उघडतो...तर ते तिघेही एकमेकांना पाहून Surprise होतात. नवऱ्याला Surprise देण्यासाठी आलेली बायको स्वत:च Surprise होते. बायको देशाच्या सेवेसाठी लढतं असते आणि इथे तिचा नवरा एका दुसऱ्या महिलेसोबत असतो. बायकोने या दोघांना रंगेहात पडल्यामुळे नवऱ्याचं ही भानगंड उघड होते. नवऱ्याचं Extra Marital Affair पाहून बायकोला आयुष्यभराची जखम देऊन जाते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Olu Chi (@join_us_1m)

व्हिडिओ व्हायरल 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील Join_us_1m या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ परदेशातील असून या व्हिडिओमागील तथ्य समोर आलेलं नाही. मात्र देशभरात आजकाल Extra Marital Affair अनेक घटना समोर येतं आहे. कधी नवरा तर कधी बायको कोणीतरी लग्नाबाहेरील संबंधामध्ये अडकतात आणि आपल्या पाटर्नरला धोका देतात.