Layoff : मंदीचा फटका, नोकरीचा चटका! `या` कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
Job News : फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरनंतर आता अजून एका कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड (Global Recession in 2022) पडणार आहे.
Layoff 2022 : काही दिवसांपूर्वी ओयोने 600 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं. यापूर्वी फेसबुक (Facebook), मेटा (Meta), अॅमेझॉन (Amazon) आणि ट्विटर (Twitter) या नावाजलेल्या कंपन्यांनी अचानक कर्मचाऱ्यांचा नोकरीवर गदा आणली. नोकरी कपातीचं संकट अजूनही कर्मचाऱ्यांवर घोंगावतंय. अशातच अजून एका लोकप्रिय कंपनीने नोकर कपातीचा (Staff reduction) निर्णय घेतला आहे. पेप्सिको कंपनीही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या म्हणण्यानुसार 100 अधिक कर्मचाऱ्यांची नोकरी (Cost Cutting) जाण्याची शक्यता आहे. पेप्सिको कंपनीच्या हितासाठी कर्मचारी कपात करण्याचा विचार करत आहेत. त्यासाठी त्यांनी एक अहवालदेखील सादर केला आहे. दरम्यान पेप्सिको (PepsiCo) कंपनीकडून याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
कंपनीकडून सांगण्यात आले कारण
कंपनीनेकर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये, जर्नलनुसार, पेप्सिकोने कर्मचाऱ्यांना सांगितलं की, टाळेबंदीचा उद्देश संस्था सुलभ करणे हा आहे जेणेकरून आम्ही अधिक कार्यक्षमतेने काम करू शकू. ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यांनी धडाधड कर्मचाऱ्यांना घरी बसवायला सुरुवात केली. त्यानंतर आता मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांची मेटा आणि जागतिक ऑनलाईन कम्युनिटी प्लॅटफॉर्म ब्रेनलीनं कर्मचारी कपात जाहीर केलीय. (Facebook Meta Amazon and Twitter PepsiCo will now lay off employees)
हेसुद्धा वाचा - Amitabh Bachchan : फक्त 75 रुपयात अमिताभ बच्चन झाले करोडपती, जाणून घ्या कसे?
मंदीचा फटका, नोकरीचा चटका!
सध्या सुरु असलेली टाळेबंदी (Job cut) ही कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी असल्याचं म्हटलं जातं आहे. महागाई आणि जागितक मंदीची फटका हा कर्मचाऱ्यांना बसतो आहे. विशेषत: आयटी कंपनीत (IT Company)काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा फटका बसणार आहे. अमेरिका, युरोप यांसारख्या अनेक मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेत चढ-उतारांचा काळ सुरु आहे. त्यामुळे नावाजलेल्या कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवतं आहे. तरदुसरीकडे अमेरिकेतील मंदी भारतासाठी (India) संधी ठरु शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे.