Amitabh Bachchan Investment in IPO Stock Market : बॉलिवूडचे बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष केला आहे. एकेकाळी कर्जात बुडालेले मेगास्टार आज करोडोंच्या घरात आहेत. 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati ) या लोकप्रिय कार्यक्रमातून लोकांना करोडपती बनविणारे बिग बी करोडपती झाले आहेत. एक छोटीशी गोष्ट त्यांनी केली आणि आज ते मालामाल झाले आहे आणि तेही फक्त 75 रुपयांमध्ये...
अमिताभ बच्चन यांनी एका छोट्या कंपनीचे (multibagger returns from smallcap) शेअर्स खरेदी केले. पाच वर्षांपूर्वी मार्केटमध्ये (share market) आलेली आयपीओमध्ये (IPO) त्यांनी 75 रुपयांचे शेअर खरेदी केले होते. आज या शेअरमुळे बिग बी यांना 13,41,18,400 कोटी रुपये मिळवून दिले आहेत.
बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा दीर्घकालीन स्मॉलकॅप स्टॉक (NSE SME exchange) ठेवण्याचा संयम फळाला आलं आहे. कारण DP वायर्सचे शेअर्स 2017 पासून 5 पटीने वाढले आहेत. 5 ऑक्टोबर 2017 रोजी NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर स्टॉक लिस्ट झाल्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत अमिताभ बच्चन यांची होल्डिंग 2.45% शेअर्सवर तशीच होती. डीपी वायर्समध्ये बिग बींच्या गुंतवणुकीचे सध्याचे मूल्य जवळपास 13.4 कोटी रुपये आहे. (Amitabh Bachchan became a millionaire in just 75 rupees and share market multibagger returns from smallcap dp wires)
सोमवारच्या व्यवहारात NSE वर शेअर 408 रुपये प्रति शेअरच्या आसपास होता. आतापर्यंत कॅलेंडर वर्षात, त्यात जवळपास 58% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना बंपर रिटर्न मिळतं आहेत.
ट्रेंडलाइन डेटानुसार, अमिताभ बच्चन यांच्याकडे फक्त एक स्टॉक आहे. कंपन्यांचा उल्लेख फक्त अशा भागधारकांनाच्या नावाने केला जातो ज्यांचं कंपनीत 1 टक्के पेक्षा जास्त हिस्सा (holding) असतो.
.@itsKajolD shares some fun pictures from the sets of @SrBachchan's #KaunBanegaCarorepati as she promotes her upcoming film #SalaamVenky with director #Revathi.#Kajol #AmitabhBachchan #kbcountryradio #kbc14 #SalaamVenky #SalaamVenkyTrailer pic.twitter.com/NRxiTjzppM
— GOODTIMES (@mygoodtimes) December 5, 2022
यापूर्वी बिग बींच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये (Stock portfolio) फिनोटेक्स (Phenotex), बिर्ला पॅसिफिक मेडस्पा (Birla Pacific Medspa) आणि न्यूलँड लॅब्सचे (Newland Labs) शेअर्स देखील समाविष्ट आहेत.