Cambodia Leader Viral Post: हवामान बदलामुळे जगाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती पाहायला मिळत आहेत. कुठे कडाक्याच्या उन्हामुळे दुष्काळसदृश परिस्थिती आहे, तर कुठे पुरात सर्व काही वाहून गेलं आहे. दोन्ही घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होताना दिसत आहे. जगभरात आपत्तीच्या घटना घडत असताना एका नेत्याच्या भविष्यवाणीमुळे (predicts disaster) कंबोडियामध्ये खूप गोंधळ उडाला आहे. नेत्याच्या पोस्टमुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, कंबोडियाचे नेते खेम वीसना (Khem Veasna) यांनी नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, संपूर्ण जगात भीषण पूर येणार आहे. त्यात सर्व काही वाहून जाईल. या पुरापासून तेच लोक वाचतील जे टेकडीवर वसलेल्या आपल्या शेतात आश्रय घेतील. त्यांच्या दाव्यामुळे देशात खळबळ माजली आहे. 


डेमोक्रसी पार्टीचे  (LDP) अध्यक्ष खेम वीसना यांनी केलेली ही पोस्ट तुफान व्हायरल झाली. यानंतर  Kulen Mountain येथील त्यांच्या फार्म हाऊसवर खेम यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ज्या ठिकाणी खेम वीसना यांनी नागरिकांना येण्यासाठी सांगितलं होतं. त्याठिकाणी आता जवळपास 30 हजार लोक पोहोचले आहेत.


या अफवेनंतर बिघडलेली परिस्थिती पाहून कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन (PM  Hun Sen) यांनीही पुढाकार घेत लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला.अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. (Cambodia leader Khem Veasna)


याप्रकरणी अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी प्रशासनाला दिले आहेत. हा विरोधकांचा राजकीय स्टंट असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते खेम विसाना यांच्यावर पुराचे जुने व्हिडिओ व्हायरल करून लोकांना धमकावल्याचा आरोप केला, तसेच कारवाईचा इशारा दिल्याचं समोर येत आहे.


(वरील बातमी सोशल मीडियावर पोस्टवर आधारित आहे. 'झी २४ तास' याची खातर जमा करत नाही...)