मुंबई : अनेकदा आपण एकटी आई किंवा एकटे वडिल आपल्या मुलांना कसे सांभाळतात याचे प्रेरणादायी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतेय. एक प्राध्यापक आपल्या लहान बाळाला घेऊन कॉलेजमध्ये वर्गात शिकवत आहेत. या व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. (Fact Check: This is not a widowed professor carrying his baby to class)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हायरल व्हिडीओमध्ये हे प्राध्यापक शिक्षक आहेत. यांनी आपल्या बाळाला छातीशी बांधून मुलांना शिकवलं आहे. या बाळाची आई त्याला जन्म देताच निधन पावली. यामुळे या बाळाचा सांभाळ हे प्राध्यापक एकटे करत असल्याचं सांगितलं जातं होतं. 


हा व्हिडीओ IAS अधिकारी अवनिश श्रावण यांनी आपल्या ट्विटर हँडवर शेअर केला होता. 2009 च्या बॅचचे अधिकारी अवनिश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की,'यांची पत्नीचा बाळाला जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला. मात्र त्यांनी या बाळाची जबाबदारी स्विकारली आहे. बाळाला कॉलेजमध्ये आणून हे आपली दोन्ही जबाबदारी पार करत आहेत. हे खरे हिरो आहेत.'



मेक्सिकन प्राध्यापकाची हा 2016 चा फोटो आहे. शिक्षकाने त्यांच्या एका विद्यार्थ्याचं बाळ उराशी घेतलं आहे. जेणे करून त्यांचा विद्यार्थी अभ्यासाच्या नोट्स खूप चांगल्या प्रकारे कॅरी करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, फोटोतील माणूस मोईस रेयेस सॅन्डोवल आहे. जो मेक्सिकोच्या अकापुल्को येथील इंटर-अमेरिकन युनिव्हर्सिटी फॉर डेव्हलपमेंटमध्ये कायद्याचे प्राध्यापक आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार ज्या बाळाला प्राध्यापक घेऊन आहेत तो त्यांच्या 22 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मुलगा आहे. यलेना सालास, ज्याने आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या असूनही अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.