मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हीडिओ व्हायरल होत असतात. बातमी अशाच एका व्हायरल व्हीडिओची आहे. चालत्या गाडीतून उडी घेतानाचे सीन अनेक चित्रपटात तुम्ही पाहिले असतील. पण, आज जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओत एक व्यक्ती चालत्या गाडीतून उडी मारताना दिसतेय. खतरनाक स्टंटचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. (fact check viral video man jumped in runnung car)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हायरल व्हीडिओमध्ये समोर एक मोठा खड्डा आहे. एक कार त्याच खड्ड्याकडे वेगाने येते. त्यावेळी गाडी चालवणारी व्यक्ती कार खड्ड्यात जाण्यापूर्वी त्यातून उडी मारते. त्यानंतर गाडी सरळ जाऊन खड्ड्यातच पडते.



सोशल मीडियावर स्टंट पाहून त्याची कृती काही अतिउत्साही तरुण करतात. मात्र या स्टंटमुळे दुखापत होऊ शकते. तसेच जीवावरही बेतू शकतं. त्यामुळे तुम्ही जीवघेणा स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका.