मुंबई : जगात आई आणि मुलाच्या नात्यानंतर सर्वात खास, सुंदर दुसरं कोणतं नातं असेल तर ते आहे वडील आणि मुलाचं. आई आपल्या बाळाला ९ महिने पोटात वाढवते तर वडिलही मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या संपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीत झटत असतात. वडिल आपल्या मुलांच्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी जो काही त्याग करतात, त्याची तुलना कशाचीच करता येणार नाही. परंतु चीनमधील वडिल - मुलीचा एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमधील एका हॉटेलमध्ये खाण्यासाठी पैसे कमी असल्यामुळे वडील आपल्या मुलीला हॉटेलमध्येच सोडून जातात. वडिलांनी मुलीला हॉटेलमध्ये सोडून दिल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही घटना साऊथ चीनमध्ये घडली आहे. या व्हिडिओत मुलगी रडत असल्याचे स्पष्ट दिसत असून वडिल मुलीला हॉटेलमध्ये ढकलत असल्याचे दिसत आहे. 


आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमधील हॉटेलमध्ये एका व्यक्तीने हॉटेलमध्ये ६ युआन म्हणजेच ६२ रुपयांचे जेवण केले. त्या व्यक्तीजवळ पैसे नव्हते. त्यामुळे वडिलांनी हॉटेलच्या कॅशियरकडे जाऊन 'मी माझ्या मुलीला इथे सोडून जात आहे. मी उद्या पैसे घेऊन येईन आणि मुलीला घेऊन जाईन' असे सांगितले. 



आपल्या वडिलांपासून दूर झाल्यानंतर ती लहान मुलगी सतत रडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याप्रकरणी हॉटेल मालकाने सांगितले की, वडिलांनी मुलीला इथेच सोडून दिल्यानंतर तिला आम्ही जेवण भरवले, तिच्यासोबत खेळत होतो. हॉटेल मालकाने आम्ही तिला किचनमध्ये बसवून दूध प्यायला दिल्याचेही सांगितले. मुलीला सोडून गेल्यानंतर हॉटेल मालकाने पोलिसांना बोलवून घटनेबाबत संपूर्ण माहिती दिली.