माकडीणीने खाल्ला स्वत:च्याच पिल्लाचा मृतदेह, दृष्य पाहून सारेच हादरले! कारण जाणून बसेल धक्का
Monkey Eats Its Own Baby: सामान्यपणे वानरांच्या ज्या प्रजाती अशाप्रकारे आपल्याच पिल्लांचा मृतदेह खातात त्यामध्ये माकडांचा समावेश होत नाही. मात्र या माकडीणीने स्वत:च्याच पिल्लाचा मृतदेह कुरतडून खाण्यामागील कारण समोर आलं आहे.
Monkey Eats Its Own Baby: युरोपमधील एका प्राणीसंग्रहालयामध्ये एक अजब प्रकार घडला आहे. हा संपूर्ण घटनाक्रम पाहून अनेकांना धक्का बसला आहे. असा प्रकार यापूर्वी कधीही पाहिला नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. खरं तर हा प्रकार फार हृदयद्रावक आहे. एका माकडीणीने तिच्याच मृत पिल्लाचा मृतदेह खाल्ला. सामान्यपणे माकडं असा प्रकार करत असल्याचं दिसून येत नाहीत. आपल्याच मृत पिल्लांचा मृतदेह खाणाऱ्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच वानराच्या प्रजाती असून त्यात माकडांचा समावेश होत नाही.
ती एक दिवस मृतदेह घेऊन फिरत होती
माकड आपल्याच पिल्लाचा मृतदेह खाण्याचं कारण खरं तर फार विचित्र वाटले. मात्र वैज्ञानिक दृष्टीकोनातून हे कारण योग्य असल्याचं मानलं जात. यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्येही अशी एक घटना घडली होती. चेक प्रजासत्ताक देशातील ड्रवुर क्रालोव वाइल्ड पार्कमध्ये हा प्रकार घडला होता. कुमासी नावाच्या माकडीणीने आपल्या पिल्लाचा मृतदेह घेऊन एक दिवस फिरत होती. काहीही करुन पिल्लू परत जिवंत व्हावं असा तिचा प्रयत्न होता. ही माकडीण ड्रिल प्रजातीची होती. या प्रजातीमधील माकडं आपल्याच मृत पिल्लांचा मृतदेह खात नाहीत. मात्र या माकडीणीने असं केल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. ही घटना फारच दुर्मिळ आहे. पहिल्या दिवशी मृतदेह घेऊन फिरणाऱ्या या माकडीणीने दुसऱ्या दिवशी पिल्ल्याच्या मृतदेहाचा बराच भाग कुरतडून खाल्ला. मात्र ही माकडीण एकटीच पिल्लाचा मृतदेह खात होती. तिच्या कळपातील इतर माकडं पिंजऱ्यामध्ये फार दूर उभी होती.
...म्हणून ती मृतदेह घेऊन फिरत राहिली
इटलीमधील पीसा युनिव्हर्सिटीमधील प्राणीतज्ज्ञ एलिझाबेथ पलागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन नये याच हेतूने कुमासी नावाच्या माकडीणीने पिल्लाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह स्वत:जवळ ठेवला होता. आपलं बाळ मेलं आहे हे मान्य करणायला कुमासी तयार नव्हती. हा मृतदेह आपल्या डोळ्यांसमोरच रहावा असा कुमासीचा प्रयत्न होता.
मृतदेहाचे तुकडे करुन फेकले
माकडाबरोबरच अनेक प्राणी त्यांची पिल्लं जिवंत आहेत की नाही हे डोळ्यांच्या हलचालींवरुन ओळखतात. कुमासीही हेच करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र बराच काळ गेल्यानंतरही पिल्लाच्या डोळ्यांची हलचाल झाली नाही. त्यामुळेच कुमासीने मृतदेहाचे तुकडे करुन इकडे तिकडे फेकण्यास सुरुवात केली. मात्र तिने मृतदेहाचे तुकडे असे इकडे तिकडे का फेकले यामागील कारपण स्पष्ट झालेलं नाही.
...म्हणून खाल्ला मृतदेह
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, वानरांच्या काही प्रजाती आपल्या मेलेल्या पिल्लांच्या मृतदेहांचे तुकडे खाऊन गर्भावस्थेमुळे कमी झालेली शरीरातील ऊर्जा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा मातृत्वाची तयारी करण्याच्या दृष्टीने मादी वानर असं करत असल्याचं संशोधक सांगतात. याच कारणामुळे कुमासीने एकटीनेच तिच्या पिल्लाचा मृतदेह खाल्ला. तो कोणाबरोबरच वाटून घेतला नाही कारण तिलाच या पोषक तत्वांची फार आवश्यकता होती.