Chang'e-6 Pakistan China Moon: अखेर पाकिस्तानची चंद्रावर स्वारी करण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. चीनच्या भरोशावर पाकिस्तानने पहिले मून मिशन राबवले आहे.  भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तान देखील चंद्रावर स्वारी करण्याचा पण केला होता. पाकिस्तानने चीनच्या मदतीने आपले मून मिशन लाँच केले. पाकिस्तानचे चांद्रयान अर्थात सॅटेलाईटचा अवकाशात झेपावला आहे. चीनची स्पेस एजन्सी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (CNSA)  चीन आणि पाकिस्तानचे संयुक्त मून मिशन फत्ते केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन चांगई-6 हे मून मिशन लाँच केले आहे. चीनचे Chang'e-6 हे यान अवकाशात झेपावले आहे. लाँग मार्च 5 रॉकेट वापरून हेनान बेटावरील वेनचांग स्पेस साइटवरून Chang'e-6 हे यान प्रक्षेपित करण्यात आसे. चांगई-6 हे मून मिशनच्या माध्यमातून चीनने  चंद्रावर सॅटेलाईट पाठवला आहे. इतर देशांप्रमाणे चंद्र मोहिम लाँच करणाऱ्या देशांच्या यादतीत आपले देखील असावे यासाठी  पाकिस्तानने चीनच्या मदतीने मून मिशन राबवले आहे.


डब्याच्या आकाराचे पाकिस्तानचे चांद्रयान


पाकिस्तानचे अतिशय सूक्ष्म यान चंद्रावर गेले आहे.  पाकिस्तानचे चांद्रयान हे छोट्याशा बॉक्सच्या आकाराचे आहे. साधारण 1x1 फूट आकाराचा हा चौकोनी बॉक्स आहे. हा बॉक्स म्हणजेच पाकिस्तानचे चांद्रयान आहे. पाकिस्तानच्या या चांद्रयानचे नाव क्यूबसॅट अर्थात IQub-Q असे आहे. चीनच्या चांगई-6 हे मून मिशन अंतर्गत चीनने Queqiao-2 आणि Magpie Bridge-2 उपग्रह चंद्रावर पाठवले आहेत. चीनच्या या उपग्रहांसह पाकिस्तानचा क्यूबसॅट हा उपग्रह देखील अवकाशात झेपावला आहे.


चीनच्या मून मिशनमध्ये पकिस्तानसह आणखी चार देशांचा सहभाग


चीनच्या मून मिशनमध्ये पकिस्तानसह आणखी चार देशांचा सहभाग असणार आहे. चांगई-6 हे मून मिशन मध्ये चीन चार देशांचे पेलोड आणि उपग्रह घेऊन चंद्राच्या दिशेने झापावले आहे. फ्रान्सचे डोर्न रेडॉन डिटेक्शन इन्स्ट्रुमेंट, युरोपियन स्पेस एजन्सीचे निगेटिव्ह आयन डिटेक्टर, इटलीचे लेझर रेट्रोरेफ्लेक्टर आणि पाकिस्तानचे क्यूबसॅट्स अर्थता छोटे उपग्रह चीनच्या लाँच करण्यात आले आहेत.


चीन चंद्राच्या अत्यंत गडद भागात संशोधन करणार


चंद्र आणि पृथ्वी यांच्यात संवाद प्रस्थापित करण्याचा चीन मून मिशनचा उद्देश आहे. यासाठा चीन Queqiao-2 किंवा Magpie Bridge-2 उपग्रह चंद्रावर पाठले आहेत.  चांगई-6 मोहिमेअंतगर्त चीन चंद्राच्या अत्यंत गडद भागात संशोधन करणार आहे. अद्याप येथे कोणतेही संशोधन झाले नसल्याचा दावा चीनने केला आहे. हा भाग  दक्षिण ध्रुवाजवळच आहे.