लास वेगास :  अमेरिकेतील लास वेगासमध्ये गोळीबार झाला आहे, एका कॅसिनोतील कंट्री म्युझिक फेस्टीवलमध्ये हा गोळीबार झाला, या गोळीबारात 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 पेक्षा जास्त नागरीक हे जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिक वेळेनुसार रविवारी रात्री हा हल्ला झाला.


म्युझिक फेस्टीवलमध्ये गोळीबार करणाऱ्या एकाला ठार केल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. तीन बंदूकधाऱ्यांनी हा गोळीबार केला असल्याचं वृत्त काही अमेरिकन वेबसाईटसने दिले आहे. काही नागरिकांच्या अंगावर गोळीबाराच्या जखमा असल्याचं युनिवर्सिटी मेडिकल सेंटरच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.