H5 Bird Flue Case : अमेरिकेत प्रथमच H5 बर्ड फ्लूचा एक रुग्ण आढळून आला आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने ही माहिती दिली. सीडीसीने एका निवेदनात म्हटले आहे की या आठवड्याच्या सुरुवातीला घेतलेल्या चाचणीत व्यक्तीच्या नाकातून घेतलेल्या नमुन्यात इन्फ्लूएंझा ए (एच5) विषाणू आढळला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुक्कुटपालन व्यवसायात गुंतलेली व्यक्ती


ही व्यक्ती थेट पोल्ट्रीच्या संपर्कात असल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. H5N1 बर्ड फ्लूची लागण झालेल्या पक्ष्यांना मारण्याच्या कामात तो गुंतला होता.


संक्रमित व्यक्तीचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे. व्यक्तीला थकवा जाणवत होता. संक्रमित व्यक्तीला वेगळे ठेवण्यात आले आहे. सीडीसीने 27 एप्रिल रोजी त्याच्या नाकातून घेतलेल्या नमुन्याची पुष्टी केली. ही व्यक्ती इन्फ्लूएंझा अँटीव्हायरल औषध ओसेल्टामिवीर (टॅमिफ्लू) घेत आहे. फेब्रुवारीमध्ये, एव्हीयन फ्लू प्रथमच इंडियानामध्ये आयात केलेल्या पक्ष्यांच्या कळपात आढळून आला. 2020 नंतर अमेरिकेत एव्हीयन फ्लू संसर्गाची ही पहिलीच घटना आहे.


चीनमध्येही असाच प्रकार समोर आला


विशेष म्हणजे, अलीकडेच, चीनच्या हेनान प्रांतात मानवामध्ये एव्हीयन फ्लूच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाली. तो H3N8 स्ट्रेनने संक्रमित झाला होता. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले होते की, पक्ष्यांच्या संपर्कात आल्यानंतर 4 वर्षांच्या मुलाला संसर्ग झाल्याचे आढळून आले. ताप आणि इतर लक्षणे दिसू लागल्याने रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाचे कुटुंबीय घरीच कुक्कुटपालन करत होते. या भागात जंगली बदकांची संख्याही जास्त आहे.