गळ सोडून थेट गळ्यात पोहोचला मासा, पाहा नेमका काय घडला प्रकार
पाण्यातून बाहेर आलेला मासा थेट मच्छीमाराच्या गळ्यातच अडकला, डॉक्टरही चक्रावले
viral news : काळ आणि वेळ कधी कुठे कशी गाठेल याचा पत्ता नाही. भविष्याची ग्वाही नाही आणि भूतकाळात रमण्यात अर्थ नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपला जीव सांभाळून रोज जगत असतो. काळजी घेऊनही बऱ्याचदा विचित्र दुर्घटना होतात. असाच एक विचित्र प्रकार समोर आला.
गळ सोडून मासा थेट मच्छिमाराच्या गळ्यात घुसला. वाचून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. मात्र प्रत्यक्षात ही धक्कादायक घटना घडली आहे. द न्यूयॉर्क पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार मासा सरळ जाऊन मच्छिमाराच्या गळ्यात अडकला.
या धक्कादायक घटनेमुळे मच्छिमाराचा श्वास अडकला. मासा पाण्यातून उडी मारून थेट घशात कसा अडकला यावर खुद्द मच्छिमाराचाही विश्वास बसत नव्हता. प्रकृती बिघडत असल्याचे पाहून तेथे उपस्थित लोकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
गळ्यात मासा अडकल्याचं पाहून थायलंडच्या फथालुंग इथले सरकारी रुग्णालयातील डॉक्टरही हैराण झाले. सध्या या मच्छिमाराचे नाव अजून समोर आलं नाही. मात्र ही घटना 22 मे रोजी थायलंड इथे घडल्याचं सांगण्यात आलं आहे.
सिटी स्कॅनमध्ये मच्छिमाराच्या गळ्यात मासा अडकल्याचं दिसलं आणि डॉक्टरही चक्रावले. त्यांनी शस्त्रक्रिया करून या माशाला बाहेर काढलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अशी केस पहिल्यांदाच पहिली होती.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार 5 इंचाचा मासा मच्छिमाराच्या घशातून बाहेर काढला. या प्रकरणानंतर डॉक्टरही चक्रावले आहेत. सुदैवानं यामध्ये मच्छिमाराचा जीव वाचला आहे.