नोकरीची संधी पण काम म्हणजे मृत्यूचा खेळ, जाणून घ्या
उपद्रवी मगरीला पकडण्यासाठी वॅकेंसी
न्यूयॉर्क : एका वेगळ्या पद्धतीची नोकरी चालून आली आहे. ही नोकरी करणं कोणालाही आवडेल पण या नोकरीत जे काम करावं लागेल ते खूपच धोका पत्करणारं असू शकत. लोकांना त्रास होत असलेल्या मगरींना पकडण्याचं हे काम आहे. 'फ्लोरिडा फिश एंड वाइल्डलाइफ कंजर्वेशन कमीशन ऑफ डिव्हिजन ऑफ हंटिंग एंड गेम मॅनजमेंट'ने या उपद्रवी मगरीला पकडण्यासाठी वॅकेंसी काढली आहे. यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी निवेदन करण्यास सांगण्यात आले आहे. ही पूर्ण वेळाची नोकरी नसणार आहे. पण यातून तुम्हाला तुमचा खर्च मिळणार आहे. स्टेटवाईड न्यूसन्स एलीगेटर प्रोग्राम (SNAP) ने यासाठी पुढाकार घेतलाय.
मगरीला पकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून कोणाचही घर चालणार नाही असं मत फिश एंड वाइल्डलाईफ कंजर्वेशनने म्हटलंय. अनेक ट्रॅपर्सकडे या कामाव्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर मार्ग असतात असेही त्यांनी म्हटले.
जॉब संदर्भात फ्लोरिडा एफडब्ल्यूसीने काही स्पष्टीकरण दिलं आहे. मासे आणि वन्यजीव नियमांचे पालन करण्याची पार्श्वभुमी या उमेदवाराकडे असायला हवी. याने कोणत्याही प्रकारच्या वन्यजीव नियमांचे उल्लंघन न केलेले असावे. उमेदवाराला आपल्या आरोग्य, सुरक्षेची जबाबदारी स्वत:ला घ्यायला हवी.
मगरींच्या हल्ल्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी हा पुढाकार घेतल्याचे एफडब्यूसीने म्हटलंय. फ्लोरिडाच्या एका महिलेवर मगरीने हल्ला केल्यानंतर ही बाब अधिक गांभीर्याने समोर आली.