लिमा : पेरुच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एलिझाबेथ एस्तेतेने Elizabeth Astete यांच्यावर कोरोनाची (Corona Vaccine)लस घेतल्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. एलिझाबेथ एस्तेते यांनी ही लस 22 जानेवारी रोजी घेतली होती, असं त्यांनी दिलेल्या वक्तव्यात म्हटलेलं आहे. एलिझाबेथ यांनी पहिली लस घेतली पण आता दुसरी लस घेण्याची त्यांची इच्छा होत नाहीये. कारण पहिली लस ही त्यांनी चोरुन घेतली होती, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील मंत्र्यांनेच चोरून लस घेतल्याचा अंसतोष पेरुच्या नागरिकांमध्ये आहे. हा असंतोष पाहून चोरुन लस घेतल्याच्या कारणावरुन एलिझाबेथ यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली आहे.


कोरोना योद्धे जे पेरुत अत्यावश्यक सेवेसाठी काम करत होते. जे (FRONT LINE WORKER) कोरोनाशी लढण्यास सर्वात पुढे होते, त्यांच्याआधी मंत्र्यांने कोरोनाची लस घेतल्याने जनतेत असंतोष होता. म्हणून एलिझाबेथ यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.


मंत्र्याने चोरुन लस घेतल्याची बातमी जेव्हा पेरुमध्ये पसरली, तेव्हा आणखी एक गोष्ट समोर आली. माजी राष्ट्राध्यक्ष मार्टिन विजकारा यांनी आणि त्यांच्या पत्नीने एका चीनी (sinopharm) कंपनीकडून कोरोनाची लस घेतल्याचं मान्य केलं आहे.