नवी दिल्ली : जगभरातल्या कुख्यात हक्कानी नेटवर्कचा संस्थापक, अफगाणिस्तानातला खूंखार दहशतवादी जलालुद्दीन हक्कानीचा मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हक्कानी आजारी होती. हक्कानी नेटवर्कचं नेतृत्व सध्या त्याचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानी करत आहे. ओसामा बिन लादेनशी हक्कानीचे घनिष्ठ संबंध होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालिबानच्या राजवटीत जलालुद्दीन हक्कानी मंत्रीही होता. अफगाणिस्तानात अनेक हल्ले घडवून आणण्यात हक्कानीचा सहभाग होता. हक्कानीचे पाकिस्तानातल्या लष्करी अधिकाऱ्यांशीही घनिष्ठ संबंध होते. एवढंच नाही तर पाकिस्तानी गुप्तहेर खात्याचं हत्यार असा हक्कानीचा उल्लेख अमेरिकन नौदल प्रमुखांनी केला होता. 


आत्मघाती पथकाद्वारे हल्ला करण्यासाठी हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी प्रामुख्याने ओळखले जात असतं. गेल्या अनेक महिन्यांपासून जलालुद्दीन हक्कानी आजारी होता. त्याच्या मृत्यूमुळे हक्कानी नेटवर्कला फारसा फरक पडणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे.