नवी दिल्ली : मसूद अजहर संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मसूद अजहरविरोधात ही मोठी कारवाई केली आहे. जैश-ए-मोहम्मदने 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर भारताने ही मागणी लावून धरली होती. 75 दिवसानंतर मोदी सरकारला हे मोठं यश मिळालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा समितीचे सदस्य देश अमेरिका, ब्रिटेन, फ्रांस यांनी पाठिंबा दिला होता. पण चीन या प्रकरणात पुन्हा-पुन्हा वीटो लावत होता. १० वर्षात चीनने असं ४ वेळा केलं. पण शेवटी मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चीनला ही मान्य करावं लागलं.


संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधित्व करणारे राजदूत सैयद अकबरूद्दीन यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, 'मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. यामध्ये पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचं धन्यवाद.'



फ्रान्सकडून स्वागत


फ्रान्सने सुरक्षा परिषदेच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. फ्रान्सने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशवतादी घोषित करण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न केले होते. पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या मसूदवर फ्रान्स सरकारने १५ मार्चला बंदी घातली होती. फ्रान्सने भारताच्या मागणीला पाठिंबा देत. सुरक्षा परिषदेत हा प्रस्ताव ठेवला. अखेर आज हा प्रस्ताव सगळ्या सदस्यांनी मान्य केला.


आंतरराष्ट्रीय दहशवतादी घोषित झाल्यानंतर आता मसूद अजहर यूएनमधील सदस्य देशामध्ये नाही जावू शकणार. मसूदची संपत्ती देखील जप्त केली जाईल. यूएनशी संबंधित देश त्याची मदत नाही करु शकणार. त्याला हत्यार देखील नाही देऊ शकणार.