फ्रॅंकफर्ट : जर्मनीतील फ्रॅंकफर्ट विमानतळावर केमिकल हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे विमानतळ आणि परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. तर, अनेकांच्या डोळ्यांना इजा पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, जर्मनीतील फ्रॅंकफर्ट विमानतळाच्या चेक इन काऊंटरवर एका अज्ञात व्यक्तीने टियर गॅसचा हल्ला केला. यानंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला. विमानतळ आणि परिसरातील लोकांना श्वास घेणे मुश्किल झाले. वातावरणात पसरलेले केमिकल हे मानवी आरोग्यास घातक असल्यामुळे नागरिकांच्या डोळ्यांनाही प्रचंड त्रास होत असल्याचे समजते.


एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात, या हल्ल्यात काही लोग जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. जखमी लोकांना जवळच्या रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विमानतळावरील चेक इन काऊंटर्सवर येणाऱ्या लोकांना तपासणीनंतरच प्रवेश मिळालेला असतो. मात्र, या परिसरात नेहमीच मोठी गर्दी असते.



द इंडिपेंडेंटने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ च्या सुमारास विमानतळाच्या टर्मिनल १ जवळ घडली. पोलिसांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी आाला आणि त्याने मशीनच्या माध्यमातून केमिकल स्प्रे फवारला. पोलिसांनी हल्लेखोराला पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहेत.