पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron)वर सोमवारी अंड फेकण्यात आलं. हे अंड फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या खांद्यावर पडले. सोमवारी इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्समधील ल्योन शहरातील इंटरनॅशनल फूड ट्रेड फेअरमध्ये (International food trade Fare) सहभागी झाले होते. याच दरम्यान एका व्यक्तीने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर अंड फेकलं. (Egg thrown on Emmanuel Macron) या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रपतींना एका व्यक्तीने कानाखाली मारली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात इमॅन्युएल मॅक्रॉन गर्दीतून जात असल्याचे दिसून येते, जेव्हा एक अंडे येऊन त्याच्या खांद्यावर आदळते. या दरम्यान अंडी फुटत नाही. राष्ट्रपतींचे दोन बोगीगार्ड त्यांच्या जवळ येत आणि त्यांना एस्कॉर्ट करताना दिसतात. व्हिडिओमध्ये  एका व्यक्तीला इतर अंगरक्षकांनी पकडले आणि नेले.


या दरम्यान, पत्रकारांनी फ्रांचच्या राष्ट्रपतींना हे बोलताना ऐकलं की, 'जर मला काही सांगायचे असेल तर त्याला माझ्याकडे येऊ द्या.' आतापर्यंत, ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची ओळख आणि त्याने फेकलेल्या अंड्यामागील कारणांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.



आधी कानाखाली आता फेकलं अंड... व्हिडीओ व्हायरल तीन महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने राष्ट्रपतींना मारली चापट जूनमध्ये मॅक्रॉन यांना एका व्यक्तीने त्यांच्या तोंडावर चापट मारली होती. या दरम्यान, फ्रान्सचे अध्यक्ष दक्षिण-पूर्व फ्रान्समधील एका छोट्या शहरात जनतेला शुभेच्छा देत होते. त्यांनी त्या काळात हिंसा आणि मूर्खपणाचा निषेध केला होता. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या समर्थना करता वेगवेगळ्या विचारांचे लोक आले.



व्हॅलेन्स शहरात जमाव जमला होता. त्यांच्यासमोर बॅरिकेंडिंग लावण्यात आलं होतं. मॅक्रॉन त्यांच्या दिशेने जात होते. यावेळी जमावातील एका व्यक्तीने मॅक्रॉन यांच्या श्रीमुखात भडकावली.