वॉशिंग्टन : अमेरिका  (USA) अशा देशांपैकी एक आहे ज्यामध्ये कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह असलेल्यांची संख्या जास्त आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत ३ लाखाहून अधिकजण संक्रमित झालेयत. दरम्यान अमेरिकी कंपनी फायझर (Pfizer)च्या कोरोना वॅक्सीन (Vaccine)ची एलर्जिक रिएक्शन (Allergic Reaction) होण्याची शक्यता असल्याने लोकांची चिंता वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील कोरोना वॅक्सिन निर्माता कंपनी फायझर (Pfizer) ने देशातील संपूर्ण जनतेला वॅक्सिन देण्याची तयारी पूर्ण केलीय. गेल्या बुधवारी अमेरिका सरकारने १० कोटी डोसचा व्यवहार देखील केला. पण फायझर वॅक्सिन (Vaccine)हून एलर्जिक रिएक्शन (Allergic Reaction) होण्याची शक्यता जास्त असल्याचे म्हटलं जातंय. 



फायझरच्या कोरोना वॅक्सिनमुळे एलर्जिक रिएक्शन होण्याची शक्यता जास्त असल्याचे ऑपरेशन वार्प स्पीडचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. मोनसेफ सलाई यांनी सांगितले. फायझरच्या कोरोना वॅक्सिनमुळे ८ जणांना एलर्जिक रिएक्शन झाले. यातील ६ अमेरिकन नागरिक आहेत. 


अमेरिकेने फायझर कंपनीसोबत १० कोटी वॅक्सिनचा करार करण्याच्या १ दिवस आधी डॉ. मोनसेफ यांचे हे विधान समोर आलंय. त्यामुळे या विधानाला खूप महत्व प्राप्त झालंय.